
बसपाचा कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा नाहीअमरावती, 29 जानेवारी (हिं.स.)। राज्य सरकारकडून महापालिका निवडणुकीत विजयी उमेदवारांचे गॅझेट प्रसिद्ध झाल्यानंतर मनपामध्ये गटनेते निवडीसंदर्भातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टनि (बसपा) अमरावती महानगरपालिकेत स्वतंत्र गट स्थापन केला असून, गटनेतेपदी विद्या माटे यांची निवड करण्यात आली आहे.
बसपाचे जिल्हाध्यक्ष अजय गोंडाणे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, सध्या बसपाचा कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा नाही. बसपाचा स्वतंत्र गट स्थापन करून त्यासंदर्भातील अधिकृत प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयात सादर करण्यात आलेला आहे. या गटामध्ये विद्या माटे यांच्यासह इस्माईल लालूवाले आणि सचिन वैद्य यांचा समावेश आहे. हे तिघेही नवनिर्वाचित नगरसेवक फ्रेजरपुरा-रुक्मिणी नगर प्रभाग क्रमांक ११ मधून बसपाच्या तिकिटावर निवडून आले आहेत. महापालिकेच्या महापौर, व उपमहापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी गटनेते निवडीची प्रक्रिया गतिमान केली आहे. दरम्यान, बसपाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. सुनील डोंगरे यांनी विद्या माटे यांची बसपा गटनेतेपदी अधिकृत नियुक्ती केली आहे. ---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी