जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीचे भाव ऐतिहासिक पातळीवर
जळगाव , 29 जानेवारी (हिं.स.) सोने आणि चांदीचे दर दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठताना दिसत असून आज गुरुवारी सकाळीच मार्केट उघडताच जळगावच्या सराफ बाजारामध्ये दोन्ही धातूंनी ऐतिहासिक उसळी घेतली आहे.सोन्याचा तोळा 1 लाख 80 हजार रुपयांवर पोहचले आहे. तर चांदी
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीचे भाव ऐतिहासिक पातळीवर


जळगाव , 29 जानेवारी (हिं.स.) सोने आणि चांदीचे दर दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठताना दिसत असून आज गुरुवारी सकाळीच मार्केट उघडताच जळगावच्या सराफ बाजारामध्ये दोन्ही धातूंनी ऐतिहासिक उसळी घेतली आहे.सोन्याचा तोळा 1 लाख 80 हजार रुपयांवर पोहचले आहे. तर चांदीच्या दराने चार लाखांचा आकडा पार केला आहे. व्यासायिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे, परंतु ज्यांच्याकडे लग्न आहेत त्यांच्यासाठी ही चिंता वाढवणारी बाब असून त्यांच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे.जागतिक बाजारातील चलनवाढ, डॉलरच्या किंमतीत बदल, आणि मागणी-पुरवठ्याचे संतुलन हे या वाढीचे कारण आहे. त्याचबरोबर अनेक देशांमधील नागरिक हे सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत. याचाच परिणाम हा सोने आणि चांदीच्या भावावर होतोय. सोन्यासह चांदीचे भाव ऐतिहासिक पातळीवर पोहोचल्याने खरेदीदारांनी खरेदीकडे पाठ फिरवली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande