
मुंबई, 29 जानेवारी, (हिं.स.)। गेल्या 4 वर्षांत दमदार विक्रीवाढ झाल्यानंतर, महिंद्राच्या ट्रक आणि बस व्यवसायाने आज ओरिसातील कटक येथे आपल्या अत्याधुनिक 3एस डीलरशिपचे उद्घाटन केले. 6सर्व्हिस बे असलेल्या या सुविधेमध्ये दररोज 8 पेक्षा जास्त वाहनांचे सर्व्हिसिंग केले जाऊ शकते, तसेच येथे चालकांसाठी निवासाची सोय, 24-तास ब्रेकडाउन सहाय्य आणि ऍडब्लूची उपलब्धता देखील आहे.
ट्रक्स, बसेस आणि कन्स्ट्रक्शन इक्विपमेंटचे अध्यक्ष आणि ग्रुप एक्झिक्युटिव्ह बोर्डाचे सदस्य श्री. विनोद सहाय या प्रसंगी म्हणाले, कटक येथे आमच्या नवीन अत्याधुनिक डीलरशिपचे उद्घाटन करताना आम्हाला आनंद होतो आहे. मेसर्स माँ दुर्गा ऑटो टेक ही ओरिसामधील महिंद्रा ट्रक्स आणि बसेसची आणखी एक नवीन डीलरशिप बनली आहे. महिंद्रा ट्रक्स आणि बसेस तसेच एसएमएल यांच्याकडे आता देशभरात ट्रक्स आणि बसेससाठी 200 पेक्षा जास्त 3एस डीलरशिप आणि 400 पेक्षा जास्त दुय्यम सेवा केंद्रे आहेत, जी आमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या ग्राहकांना जागतिक दर्जाची ग्राहक सेवा प्रदान करतात. ट्रक्स आणि बसेसमध्ये महिंद्रा ग्रुपचा आता जवळपास 7% बाजार हिस्सा आहे, तर आय अँड एलसीव्ही बसेसमध्ये 24% बाजार हिस्सा आहे. आर्थिक वर्ष 31पर्यंत आमचा बाजार हिस्सा 10-12% पर्यंत आणि आर्थिक वर्ष 36 पर्यंत 20% हून अधिक करण्याचे लक्ष्य आम्ही ठेवत आहोत.
महिंद्रा ट्रक्स, बसेस आणि कन्स्ट्रक्शन इक्विपमेंटचे बिझनेस हेड डॉ. व्यंकट श्रीनिवास म्हणाले, “ग्राहक-केंद्रिततेच्या आमच्या ध्यासाने आम्हाला आमच्या ग्राहकांसाठी नावीन्यपूर्ण मूल्य प्रस्ताव तयार करण्यास प्रवृत्त केले आहे. आमच्या संपूर्ण उत्पादन श्रेणीची हमी असलेली अधिक मायलेज असो, किंवा फ्लीट मालकांना त्यांच्या वाहतूक व्यवसायावर संपूर्ण नियंत्रण देणारे सर्वात प्रगत टेलीमॅटिक्स सोल्यूशन – iMAXX असो, डीलरशिप आणि विक्री-पश्चात समर्थनाच्या इतर साधनांचे वेगाने वाढणारे नेटवर्क असो, भारतीय व्यावसायिक वाहन उद्योगात सर्वोत्तम ग्राहक अनुभव देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
महिंद्रा ब्लाझो एक्स, फ्युरिओ, ऑप्टिमो आणि जायो ही भारतातील एकमेव व्यावसायिक ट्रक श्रेणी आहे, जी दुहेरी सेवा हमीसह येते – 48 तासांत वाहन रस्त्यावर परत येईल, अन्यथा कंपनी ग्राहकाला दररोज 1000 रुपये देईल, आणि डीलर वर्कशॉपमध्ये 36 तासांत वाहन दुरुस्त होण्याची हमी, अन्यथा कंपनी दररोज 3000 रुपये देण्याची खात्री कंपनी देते आहे. सातत्यपूर्ण उत्पादन नवोपक्रम आणि ग्राहक-केंद्रिततेची बांधिलकी हे एमटीबीच्या केंद्रस्थानी आहे, ज्यामुळे ही हमी देणे शक्य झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर