झायडस तर्फे ‘तिष्ठा™’ हा निवोलुमॅबचा जगातील पहिला बायोसिमिलर सादर
अहमदाबाद, 29 जानेवारी, (हिं.स.)। आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेली, नाविन्यपूर्णतेवर आधारित जीवन-विज्ञान क्षेत्रातील कंपनी झायडस लाइफसायन्सेस लिमिटेड (तिच्या उपकंपन्या/संलग्न संस्थांसह; पुढे “झायडस” म्हणून उल्लेख) ने भारतात निवोलुमॅबचा जगातील पह
झायडस


अहमदाबाद, 29 जानेवारी, (हिं.स.)। आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेली, नाविन्यपूर्णतेवर आधारित जीवन-विज्ञान क्षेत्रातील कंपनी झायडस लाइफसायन्सेस लिमिटेड (तिच्या उपकंपन्या/संलग्न संस्थांसह; पुढे “झायडस” म्हणून उल्लेख) ने भारतात निवोलुमॅबचा जगातील पहिला बायोसिमिलर तिष्ठा™ या ब्रँड नावाखाली सादर केला आहे. या उपक्रमामुळे प्रगत बायोलॉजिक्स आणि इम्युनो-ऑन्कोलॉजी क्षेत्रातील कंपनीची वाढती क्षमता अधिक बळकट झाली आहे. तिष्ठा™ हे 100 मिलिग्रॅम आणि 40 मिलिग्रॅम अशा दोन मात्रांमध्ये उपलब्ध असून त्यांची किंमत अनुक्रमे 28,950 रु. आणि 13,950 रु. इतकी आहे. या किमती संदर्भ औषधाच्या सुमारे 1/4 आहेत. यामुळे उपचार अधिक परवडणारे होतील आणि रुग्णांवरील एकूण उपचारांचा भार कमी होईल. दोन वेगवेगळ्या शक्तींच्या या पोर्टफोलिओमुळे ऑन्कोलॉजिस्टना डोसचे योग्य नियोजन करता येते आणि औषधाचा अपव्यय कमी करता येतो. इम्युनोथेरपीच्या उपचार-अर्थशास्त्रातील एक महत्त्वाचा घटक आहे.

या घडामोडीबाबत बोलताना झायडस लाइफसायन्सेस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शर्विल पी. पटेल म्हणाले, “झायडसमध्ये, प्रत्येक रुग्णाला वेळेवर, परवडणाऱ्या आणि प्रगत कर्करोग उपचारांपर्यंत पोहोचमदत मिळायला हवी असा आमचा ठाम विश्वास आहे. तिष्ठा™ च्या सादरीकरणातून आम्ही रुग्ण-केंद्रित उपचारांच्या माध्यमातून इम्युनो-ऑन्कोलॉजीपर्यंतची उपलब्धता अधिक व्यापक करत आहोत. उपचारांच्या संपूर्ण प्रवासात रुग्णांना सातत्यपूर्ण काळजीपूर्वक सेवा देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. उच्च दर्जाचे बायोसिमिलर इम्युनोथेरपी उपचार रुग्णांना घेता यावेत यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

आधुनिक उपचारांपर्यंतची पोहोच तीन महत्वपूर्ण घटकांवर अवलंबून असते: सातत्य, परवडणारी किंमत आणि व्यापक उपलब्धता. अनेक सायकल्समध्ये उपचार आवश्यक असलेल्या कर्करोग रुग्णांसाठी चेकपॉईंट इनहिबिटर्स**ची विश्वासार्ह उपलब्धता अत्यंत महत्त्वाची असते. कारण उपचारांतील खंडामुळे कुटुंबांवर वैद्यकीय तसेच आर्थिक ताण वाढू शकतो. भारतात विकसित व निर्मित केलेले तिष्ठा™ उपचारांच्या संपूर्ण कालावधीत रुग्णांसाठी दीर्घकालीन विश्वासार्हता सुनिश्चित करते. कर्करोगासोबत जगणाऱ्या रुग्णांसाठी उपचारांचा सातत्यपूर्ण आणि अंदाजे उपलब्ध असलेला प्रवेश अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतात तिष्ठा™ सादर करून, झायडस प्रगत इम्युनो-ऑन्कोलॉजी उपचारांचे प्रमाण अधिक विस्तारत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande