
* ५० हजारांहून अधिक सेवा भागीदारांचे भविष्य सुरक्षित करणार
* 'एनपीएस प्लॅटफॉर्म वर्कर्स मॉडेल' अर्बन कंपनीच्या सेवा भागीदारांना वृद्धापकाळात देणार आर्थिक सुरक्षा
मुंबई, 29 जानेवारी (हिं.स.) - भारतातील सर्वात मोठी कॉर्पोरेट एनपीएस (NPS) आणि खाजगी क्षेत्रातील आघाडीची पेन्शन फंड संस्था 'एचडीएफसी पेन्शन फंड मॅनेजमेंट लिमिटेड'ने (HDFC Pension), अर्बन कंपनी लिमिटेडसोबत महत्त्वपूर्ण करार केला आहे. या भागीदारीद्वारे अर्बन कंपनीच्या ५०,००० पेक्षा जास्त सेवा भागीदारांसाठी 'नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) प्लॅटफॉर्म वर्कर्स मॉडेल' सादर करण्यात आले आहे.
या उपक्रमामुळे अर्बन कंपनीच्या सेवा व्यावसायिकांना 'पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी' (PFRDA) द्वारे संचलित राष्ट्रीय पेन्शन योजनेत (NPS) स्वेच्छेने सहभागी होता येईल. या भागीदारीमुळे सेवा भागीदारांना सेवानिवृत्तीच्या नियोजनासाठी एक सोपी आणि सुटसुटीत सुविधा उपलब्ध होणार आहे.
गिग वर्कस (कंत्राटी कामगार) आणि प्लॅटफॉर्म वर्कर्सचे सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य सुरक्षित करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मसोबत भागीदारी करणारे एचडीएफसी पेन्शन हे पहिले 'NPS PoP' ठरले आहे. या सहकार्यामुळे सेवा भागीदारांना त्यांच्या सोयीनुसार सेवानिवृत्तीचे नियोजन करता येईल. अर्बन कंपनी आणि एचडीएफसी पेन्शन या दोन्ही संस्था समाजातील विविध स्तरांतील भारतीयांना दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा देण्याच्या दृष्टीकोनातून एकत्र आल्या आहेत.
भागीदारीची प्रमुख वैशिष्ट्ये
लवचिक गुंतवणूक: सेवा व्यावसायिक त्यांच्या इच्छेनुसार गुंतवणुकीची रक्कम निवडू शकतात. छोट्या आणि नियमित बचतीतून ते स्वतःसाठी मोठा सेवानिवृत्ती निधी (Corpus) उभा करू शकतात.
परताव्याचे पर्याय : सेवानिवृत्तीनंतर ही रक्कम एकरकमी किंवा दरमहा ठराविक पेन्शनच्या स्वरूपात घेता येईल.
पोर्टेबिलिटी : एचडीएफसी पेन्शन प्लॅटफॉर्म अत्यंत लवचिक असून, एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर स्थलांतरित करतानाही ही योजना सुरू ठेवता येते.
डिजिटल नोंदणी : दोन्ही भागीदारांमधील डिजिटल एकत्रीकरणामुळे (Integration) केवायसी (KYC) आणि नावनोंदणीची प्रक्रिया सुलभ झाली आहे.
या भागीदारीबद्दल बोलताना अर्बन कंपनीचे सह-संस्थापक आणि सीईओ अभिराज सिंह भाल म्हणाले, एचडीएफसी पेन्शनसोबतची आमची भागीदारी सेवा भागीदारांच्या सेवानिवृत्ती नियोजनाला संस्थात्मक स्वरूप देण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. कौशल्य विकास, विमा, कर्ज सुविधा आणि उत्पन्नाची स्थिरता यांसारख्या आमच्या आधीच्या उपक्रमांमध्ये आता या पेन्शन योजनेची भर पडली आहे.
एचडीएफसी पेन्शनचे एमडी आणि सीईओ श्रीराम अय्यर म्हणाले, भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेत गिग आणि प्लॅटफॉर्म वर्कर्सचा वाटा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांना पेन्शन सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. अर्बन कंपनीसोबतच्या या भागीदारीमुळे आम्ही 'नॅशनल पेन्शन सिस्टम' अधिक सुलभ आणि डिजिटल केली आहे.
भारतातील प्लॅटफॉर्म वर्कर्सची संख्या २०३० पर्यंत २.३५ कोटींवर पोहोचण्याचा अंदाज आहे. एचडीएफसी पेन्शनने आतापर्यंत विविध भागीदारींच्या माध्यमातून जवळपास एक लाख गिग वर्कर्सना या योजनेशी जोडले आहे.
संस्थांविषयी माहिती
एचडीएफसी पेन्शन (About HDFC Pension) : २०११ मध्ये स्थापन झालेली एचडीएफसी पेन्शन, PFRDA द्वारे नियुक्त केलेली एक परवानाधारक पेन्शन फंड संस्था आहे. ही एचडीएफसी लाईफची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे.
अर्बन कंपनी (About Urban Company) : अर्बन कंपनी हे एक तंत्रज्ञान-आधारित प्लॅटफॉर्म आहे जे स्वच्छता, दुरुस्ती, सलून आणि स्पा यांसारख्या सेवांसाठी ग्राहकांना विश्वासार्ह व्यावसायिकांशी जोडते. कंपनीच्या आर्थिक वर्ष २०२६ च्या निर्देशांकानुसार, सक्रिय सेवा भागीदारांचे सरासरी मासिक उत्पन्न २८,३२२ रुपये इतके आहे, तर अव्वल ५% भागीदार ५१,६७३ रुपयांपर्यंत कमाई करतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी