रेल्वेतुन पडल्याने उत्तर भारतीय मजुर गंभीर जखमी
जळगाव, 29 जानेवारी (हिं.स.) पाचोरा ते परधाडे रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे कि. मी. खंबा क्रं. ३७५ / २० / २४ नजीक धावत्या प्रवाशी रेल्वेतुन पडल्याने उत्तर प्रदेश येथील एका २४ वर्षीय रोड कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना सायंकाळी घडली. घटनेची माहिती म
रेल्वेतुन पडल्याने उत्तर भारतीय मजुर गंभीर जखमी


जळगाव, 29 जानेवारी (हिं.स.) पाचोरा ते परधाडे रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे कि. मी. खंबा क्रं. ३७५ / २० / २४ नजीक धावत्या प्रवाशी रेल्वेतुन पडल्याने उत्तर प्रदेश येथील एका २४ वर्षीय रोड कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना सायंकाळी घडली. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे पो. काॅ. मनोहर पाटील हे जय मल्हार रुग्णवाहिका चालक बबलु मराठे, भागवत पाटील यांचेसह घटनास्थळी दाखल होवुन घटनास्थळाचा पंचनामा करून बबलु मराठे, भागवत पाटील यांचे मदतीने तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता विघ्नहर्ता हाॅस्पीटलचे संचालक डॉ. सागर गरुड यांनी तात्काळ उपचार सुरू केले आहेत. अजय पाल असे गंभीर जखमी झालेल्या मजुराचे नाव असुन अजय पाल हे पारोळा येथे सुरु असलेल्या रोडाच्या कामावर मजुर म्हणुन काम करत होते. २८ जानेवारी रोजी अजय पाल हे त्यांचे मुळ गाव ललितपुर (उत्तर प्रदेश) येथे रेल्वेने जात होते. दरम्यान पाचोरा ते परधाडे रेल्वे स्थानका दरम्यान अजय पाल यांचा तोल जाऊन ते धावत्या रेल्वेतून पडले त्यांचा उजवा हात खांद्यापासुन, उजवा पाय गुडघ्यापासुन खाली व डाव्या पायाचा पंजा कटला आहे. रुग्णवाहिका चालक बबलु मराठे, भागवत पाटील यांच्या सतर्कतेने अजय पाल यांचे प्राण वाचविण्यात यश आले. मात्र अजय पाल यांची प्रकृती चिंताजनक आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande