बीडमध्ये रस्त्यावर कचरा फेकल्यास ५०० रुपयांचा दंड, कॅरीबॅगसाठीही दंड
बीड, 29 जानेवारी (हिं.स.)। बीड शहर स्वच्छतेसाठी बीड नगर पालिकेने कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. शहरात घंटागाड्या सुरू असतानाही रस्त्यावर कचरा फेकल्यास ५०० रूपये, सार्वजनिक ठिकाणी धुंकल्यास १५० रूपये, उघड्यावर लघवी केल्यास २०० रूपये, शौच केल्यास ५००
बीडमध्ये रस्त्यावर कचरा फेकल्यास ५०० रुपयांचा दंड, कॅरीबॅगसाठीही दंड


बीड, 29 जानेवारी (हिं.स.)।

बीड शहर स्वच्छतेसाठी बीड नगर पालिकेने कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. शहरात घंटागाड्या सुरू असतानाही रस्त्यावर कचरा फेकल्यास ५०० रूपये, सार्वजनिक ठिकाणी धुंकल्यास १५० रूपये, उघड्यावर लघवी केल्यास २०० रूपये, शौच केल्यास ५०० तर कॅरीबॅग वापरणाऱ्या वर ५ हजार रूपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. शहर स्वच्छतेसाठी बीड पालिकेची ही मोहीम महत्वाची असून यासाठी ठरणार मुख्याधिकारी शैलेश फडसे स्वतः फौज फाटा घेऊन रस्त्यावर उतरणारआहेत. बीड नगर पालिकेकडे अपुरानिधी, अपुरे मनुष्यबळ, अपुरी यंत्रणा असतांना त्यात वाढते अतिक्रमण, व्यापाऱ्यांकडून कॅरीबॅगचा वाढता वापर, घंटागाडी असतानाही नागरिक, व्यापाऱ्यांकडून रस्त्यावर कचरा फेकला जात असल्याने शहर मोठ्या प्रमाणात अस्वच्छ होत आहे.

आता बीड पालिकेने मोठा निर्णय घेतला असून रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांना आणि स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. मागील काही दिवसांपासून बीड पालिकेला स्वच्छतेसाठी यंत्रणा मिळाल्याने शहर स्वच्छ होत आहे. आता दहन कर सरवाई काल्यानंतर शहर मोठ्या प्रमाणात स्वच्छ होईल.

बीड शहरातील छोटे-मोठे व्यापारी कॅरीबॅग दुकानात ठेवत असल्याने शहराच्या चारही बाजूला आणि बिंदुसरा नदी पात्रात् कॅरीबॅगचा कचरा मोठ्या प्रमाणात साचला आहे. या कॅरीबॅग मुळे जनावरे त्या कचऱ्याभोवती मोठ्या प्रमाणात थांबतात कॅरीबॅग वापरणाऱ्यांवर आणिरस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचेच आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande