मुख्यमंत्री फडणवीसांच्या रोडशोमध्ये आ.तायडे आघाडीवर
अमरावती, 05 जानेवारी (हिं.स.)। अमरावती शहरात रविवारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भव्य रोडशोचे आयोजन करण्यात आले. या रोडशोला नागरिकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला असून शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आ
मुख्यमंत्री फडणवीसांच्या रोडशोमध्ये आ.तायडे राहिले आघाडीवर


अमरावती, 05 जानेवारी (हिं.स.)।

अमरावती शहरात रविवारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भव्य रोडशोचे आयोजन करण्यात आले. या रोडशोला नागरिकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला असून शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ठिकठिकाणी नागरिकांनी फुलांची उधळण करत मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत केले.या रोडशो दरम्यान भाजपचे आमदार प्रवीण तायडे हे रॅलीसोबत प्रत्यक्ष धावत सहभागी झाले. त्यांनी कार्यकर्त्यांसह “देवेंद्र फडणवीस आगे बढो” च्या जोरदार घोषणा देत संपूर्ण वातावरण भारावून टाकले. आमदार तायडे यांच्या ऊर्जावान सहभागामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले होते हे विशेषरोडशोच्या मार्गावर भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोल-ताशे, फलक, भगवे झेंडे आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. महिलांसह तरुणांचा सहभाग लक्षणीय ठरला.आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा रोडशो भाजपच्या शक्तिप्रदर्शनाचा महत्त्वाचा भाग मानला जात आहे. अमरावतीत भाजपने प्रचाराचा वेग वाढविल्याचे चित्र या रोडशोमधून स्पष्टपणे दिसून आले असून, पक्ष संघटन मजबूत असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande