
नांदेड, 05 जानेवारी (हिं.स.)। ऐतिहासिक नांदेड शहराचा विकास करण्यासाठी भाजपने संकल्पनामा तयार केला आहे, असे सांगत महापौर सुद्धा भाजपचाच होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तर गेल्या ७० वर्षापूर्वी राज्यकर्त्यांनी केवळ गावाचा विकास करण्यावर भर दिला व शहर विकासाकडे दुर्लक्ष केले. २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ६५ टक्के जीडीपी देणाऱ्या शहरांच्या विकासाची भूमिका मांडून हजारो कोटी रुपये शहर विकासासाठी दिले, असे सांगीतले.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील इंदिरा गांधी मैदानावर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. त्यावेळी मंचावर ना. पंकजा मुंडे, माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोक चव्हाण,
माजी मंत्री डीपी सावंत, खा. अजित गोपछडे, आ. जितेश अंतापूरकर, आ. श्रीजया चव्हाण, आ. तुषार राठोड, आ. भीमराव केराम, आ. राजे श पवार, महानगराध्यक्ष अमर राजूरकर, संतूक हंवर्डे, चैतन्य वापू देशमुख, प्रवीण साले यांच्यासह कुंडलवाडी मुदखेड व अधार्पूर येथील नगराध्यक्ष
उपस्थित होते. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, नांदेड महानगरपालिकेसाठी भाजपने सादर केलेल्या संकल्पनाम्याच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा टाकणार आहे. येत्या १६ जानेवारीला नांदेड मध्ये भाजपाचा महापौर होईल.
नांदेडला शैक्षणिक व मेडिकल निर्माण करायचंय. गत ३० ते ४० वषार्पासून केलेल्या विकास कामांचा आढावा या संकल्पनाम्यात मांडण्यात आलेला आहे. यापुढे वाहतूक समस्या, एमआयडीसीत उद्योग आणणे, रोजगार निर्मिती करणे अशा
नियोजनबद्ध विकास कामांसाठी भारतीय जनता पक्ष कटिवद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तुम्ही नियोजन शून्य लोकांच्या हातात महापालिका देणार का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. भाजपच्या पंकजा मुंडे यांनी नांदेड मनपात भाजपची सत्ता येईल, असा विश्वास व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis