सिल्लोड : शिवसेना स्वबळावर लढणार – आ. अब्दुल सत्तार
छत्रपती संभाजीनगर, 07 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका शिवसेनेचे मुख्यनेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष स्वबळावर लढवणार असून जनतेच्या पाठबळाव
जि. प., पंचायतीच्या निवडणुका स्वबळावर


छत्रपती संभाजीनगर, 07 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका शिवसेनेचे मुख्यनेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष स्वबळावर लढवणार असून जनतेच्या पाठबळावर त्या जिंकू, असा ठाम विश्वास आमदार अब्दुल सत्तार यांनी भराडी (ता. सिल्लोड) येथे व्यक्त केला. ते भराडी येथील नॅशनल शाळेच्या प्रांगणात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की, 'पक्षाने आतापासूनच तयारीला सुरुवात केली असून बूथनिहाय संघटन मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवली जाईल. स्थानिक पातळीवरील कामगिरी आणि जनतेशी असलेला थेट संपर्क हीच आमची खरी ताकद असल्याचे आहे.'

या वेळी त्यांनी कार्यकत्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन करून ते म्हणाले, 'विरोधकांकडे केवळ टीका करण्याचे राजकारण आहे, तर आमच्याकडे विकासाचे ठोस काम आहे. शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासह सर्वांगीण विकास आणि जनतेने केलेल्या

विश्वासाला शिवसेनेचा उमेदवार तडा जाऊ देणार नाही.'

या कार्यक्रमात आमदार अब्दुल सत्तार यांनी भराडी गटातून मोढा खुर्द येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील गणेश ढोरमारे या युवकाची उमेदवारी जाहीर केली. त्यास माजी जि. प. अध्यक्ष श्रीराम महाजन यांनी अनुमोदन दिले.

या प्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन गाढे, माजी जि. प. अध्यक्ष श्रीराम महाजन, माजी सभापती रामदास पालोदकर, कृउबा समितीचे उपसभापती संदीप राऊत, संचालक दामू गव्हाणे, तालुका सहकारी जिनिंग प्रेसिंगचे व्हाईस चेअरमन अनिस पठाण, भराडी सर्कल मधील आजी माजी लोकप्रतिनिधी, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande