
छत्रपती संभाजीनगर, 07 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर शहरात शुक्रवारपासून इस्कॉन मधुबन, अदालत रोड येथे सार्वभौम प्रभू यांच्या तीन दिवसीय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारी व शनिवारी दररोज सायं. ६ वा. ही कथा होईल. ११ जानेवारीला सकाळी ८ वा. आणि सायं. ६ वा. सार्वभौम प्रभू हे कथा सांगतील. इस्कॉन मधुबन केंद्रप्रमुख डॉ. रमेश लढ्ढा ऊर्फ प्रभू रामलक्ष्मणदास, विनोद बगडिया व सुदर्शन पोटभरे यांनी ही माहिती दिली. सार्वभौम प्रभू यांनी पाकिस्तानातील सिंध प्रांतात बारा भगवान श्रीकृष्ण मंदिरांचे व्यवस्थापन केले आहे, विविध देशांमध्ये त्यांनी भगवद्गीतेचा प्रचार केला आहे. सध्या त्यांचे वास्तव्य मथुरा व वृंदावनमध्ये आहे.
या भागवत कथा उत्सवासाठी आकर्षक मंच, सुसज्ज बैठक व्यवस्था तसेच भागवतातील विविध प्रसंगांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. कथेनंतर कीर्तन, ५६ भोग अर्पण आणि भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रेखा खैरनार, रचना मद्रेवार, कल्पना बगडिया, मोनिका ठाकूर आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. डॉ. सुशील भारुका, राजकुमार अग्रवाल, अॅड. धनंजय कोरे, मनोहर अग्रवाल यांनी भागवतप्रेमी नागरिकांना कथेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis