नांदेड जिल्ह्यातील पाच तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा
नांदेड, 07 जानेवारी (हिं.स.)। लोहा तालुक्यातील उमरा गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रूपसिंगतांडा, गोविंदतांडा, धनजीतांडा, परसरामतांडा, फुलमळातांडा या पाच तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाला. ही अधिसूचना राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागा
नांदेड जिल्ह्यातील पाच तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा


नांदेड, 07 जानेवारी (हिं.स.)। लोहा तालुक्यातील उमरा गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रूपसिंगतांडा, गोविंदतांडा, धनजीतांडा, परसरामतांडा, फुलमळातांडा या पाच तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाला. ही अधिसूचना राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने जारी केली आहे.

उमरा ग्रामपंचायतअंतर्गत पाच तांड्यांची ग्रामपंचायतीची निर्मिती झाली होती. सरपंच साईनाथ पवार यांनी पाच तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा मिळावा या मागणीसाठी ग्रामविकास विभागाकडे पाठपुरावा केला होता. तांड्यातील रहिवाशांनीही यासाठीपाठिंबा देऊन ग्रामपंचायतचा ठराव संमत केला. काही वर्षापासून शासन दरबारी पाठपुरावा सुरूच होता. अखेर ग्रामविकास विभागाने अधिसूचनेच्या अनुषंगाने पाच तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्वतंत्र ग्रामपंचायत दर्जा मिळाल्याने गाव विकासाला गती मिळेल, असे बोलले जात आहे.

-----------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande