ऊसतोड कामगारांसाठी आर्थिक संरक्षणाची योजना तातडीने कार्यान्वित करा : आ. धनंजय मुंडे
बीड, 07 जानेवारी (हिं.स.)। वर्षातील सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ विस्थापित होऊन विविध अपघातांसह सर्पदंश सारखी अनेक जीवघेणी संकटे अंगावर घेत ऊस तोडणी चे जोखमीचे काम करून इतरांची साखर गोड करणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या कल्याणासह त्यांचे आर्थिक संरक्षण
ऊसतोड कामगारांसाठी आर्थिक संरक्षणाची योजना तातडीने कार्यान्वित करा : आ. धनंजय मुंडे


बीड, 07 जानेवारी (हिं.स.)।

वर्षातील सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ विस्थापित होऊन विविध अपघातांसह सर्पदंश सारखी अनेक जीवघेणी संकटे अंगावर घेत ऊस तोडणी चे जोखमीचे काम करून इतरांची साखर गोड करणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या कल्याणासह त्यांचे आर्थिक संरक्षण व अपघातांमध्ये त्यांना विम्याचे संरक्षण मिळावे याबाबत मी सामाजिक न्याय विभागाचा मंत्री असताना काही योजना प्रस्तावित करण्यात आल्या होत्या, त्या योजना तातडीने कार्यान्वित करून त्यांची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी येथील रहिवासी असलेल्या ऊसतोड कामगार गणेश डोंगरे यांचा धाराशिव जिल्ह्यातील एका साखर कारखान्याच्या प्रांगणात उसाचे भरलेले वाहन रिकामी करण्याच्या प्रतीक्षेत असताना ट्रॅक्टरचे उसाने भरलेले ट्रेलर अंगावर पडून झालेल्या अपघातात दुर्दैवी निधन झाले होते. विशेष म्हणजे गणेश डोंगरे व त्याची पत्नी हे ऊस तोडणी करत असतानाच्या व्यथा अत्यंत हसत खेळत सोशल मीडियावर रीलच्या माध्यमातून मांडत असल्याने गणेश व त्याची पत्नी हे लोकप्रिय होते. गणेशच्या पत्नीचा अपघात स्थळी फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच हा अपघात घडला, त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असताना धनंजय मुंडे यांनी देखील या अपघाताबाबत एक्सपोस्ट करून दुःख व्यक्त केले आहे. गणेश डोंगरे यांचा मृत्यू म्हणजे गोड उसाची आणखी एक कडू आणि दुःखद कहानी असल्याचे धनंजय मुंडे यांनी दरम्यान लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची धनंजय मुंडे यांच्या मंत्री कार्यकाळात स्थापना, विविध योजनांचे प्रास्ताविक धनंजय मुंडे यांनी अत्यंत प्रगल्भतेने व वेगाने केले होते. मात्र मुंडे सामाजिक न्याय मंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर महामंडळाचे काम पुन्हा एकदा मंदावले. महामंडळाच्या कार्यालयाच्या कामकाजात, ऊसतोड कामगारांच्या नोंदणी अभियानात तसेच निधी संकलनात देखील महामंडळाचे काम प्रचंड मागे पडले असून, मागील दोन वर्षांत एकही ठोस योजना कार्यान्वित नाही; त्यामुळे या महामंडळाचे काम सुरळीतपणे चालवण्यास सामाजिक न्याय विभागाची उदासीनता दिसत असून हे कामकाज उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाकडे वर्ग करावे अशी मागणी धनंजय मुंडे यांनी याआधी देखील राज्य शासनाकडे पत्राद्वारे केलेली आहे पोस्टमध्ये म्हटले असून हा मृत्यू अत्यंत दुःखद व वेदनादायी असल्याचे म्हटले आहे. गरीब मात्र स्वाभिमानाने ऊस तोडणी करून आपल्या कुटुंबाचे निर्वाहन करणाऱ्या या बांधवाचे अकाली निधन झाल्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या कठीण परिस्थितीत त्याच्या कुटुंबाला आम्ही एकटे पडू देणार नाही असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. राज्य शासनाने मयत गणेश डोंगरे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीसह लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक संरक्षण व त्याच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्याची लेखी स्वरुपात मागणी राज्य सरकारकडे करणार असून लवकरच डोंगरे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार असल्याचेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande