रिल्स स्टार अथर्व सुदामेला पीएमपीने 50 हजारांचा दंडासह बजावली तिसरी नोटीस
पुणे, 08 जानेवारी (हिं.स.)। सोशल मीडियावरील रिल्स स्टार अथर्व सुदामे आता एका कायदेशीर फेऱ्यात अडकला आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाने अथर्वला दोन रिल्सप्रकरणी ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला असून, त्याला तिसरी आणि अंतिम नोटीस बजावली आहे. वारंवार दिले
रिल्स स्टार अथर्व सुदामेला पीएमपीने 50 हजारांचा दंडासह बजावली तिसरी नोटीस


पुणे, 08 जानेवारी (हिं.स.)। सोशल मीडियावरील रिल्स स्टार अथर्व सुदामे आता एका कायदेशीर फेऱ्यात अडकला आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाने अथर्वला दोन रिल्सप्रकरणी ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला असून, त्याला तिसरी आणि अंतिम नोटीस बजावली आहे. वारंवार दिलेल्या नोटिसींना प्रतिसाद न दिल्याने पीएमपी प्रशासनाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.

रिल्स प्रकरणी पीएमपीने अथर्वला यापूर्वी दोनदा नोटीस बजावून त्याची बाजू मांडण्याची संधी दिली होती. मात्र, अथर्वकडून या दोन्ही नोटिसींना कोणताही लेखी प्रतिसाद मिळाला नाही. प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता बसमध्ये चित्रीकरण केले. याबाबत खुलासा करण्यासाठी अथर्व सुदामे यांना सात दिवसांची मुदत दिली होती, मात्र बुधवारी सायंकाळपर्यंत प्रशासनाला खुलासा प्राप्त झालेला नाही. त्यामुळे आणखी एक नोटीस दिली असून, यात ५० हजारांचा दंड केला आहे. दंड न भरल्यास कायदेशीर कारवाईचा करू, असा इशारा पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी दिला आहे.

अथर्व सुदामे याने काही दिवसांपूर्वी पीएमपीच्या बसमध्ये कंडक्टरच्या पोशाखात एक रिल तयार केले होते. मनोरंजनाच्या उद्देशाने तयार केलेल्या या रिलमध्ये त्याने प्रवाशांचे चित्रण केले होते. मात्र, हे चित्रीकरण करताना त्याने पीएमपी प्रशासनाची कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नव्हती. सरकारी मालमत्तेचा व्यावसायिक किंवा मनोरंजनासाठी वापर करताना रीतसर परवानगी घेणे बंधनकारक असते, ज्याचा भंग केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

पीएमपी प्रशासनाने या रिल्सबाबत दोन मुख्य आक्षेप नोंदवले आहेत. पहिला म्हणजे प्रवाशांचा अपमान. संबंधित रिलमध्ये प्रवाशांना आक्षेपार्ह आणि अपमानजनक पद्धतीने दाखवण्यात आले आहे, ज्यामुळे संस्थेची प्रतिमा मलिन झाल्याचे पीएमपीएमएलचे म्हणणे आहे. दुसरे म्हणजे परवानगीचा अभाव. पीएमपीच्या मालमत्तेचा जसे की, बस आणि गणवेश वापरताना अथर्व सुदामेने पीएमपी प्रशासनाची परवानगी घेतली नव्हती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande