निळकंठेश्वर साखर कारखान्याची ऐतिहासिक कामगिरी; ४४ दिवसांत १ लाख टन ऊसाचे गाळप
लातूर, 8 जानेवारी (हिं.स.)। आमदार अभिमन्यू पवार यांच्या पुढाकारातून पुनरुज्जीवित झालेल्या किल्लारी येथील श्री निळकंठेश्वर सहकारी साखर कारखान्याने अवघ्या ४४ दिवसांत १ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. अनेक वर्षांपासून बंद असलेल
अ


लातूर, 8 जानेवारी (हिं.स.)। आमदार अभिमन्यू पवार यांच्या पुढाकारातून पुनरुज्जीवित झालेल्या किल्लारी येथील श्री निळकंठेश्वर सहकारी साखर कारखान्याने अवघ्या ४४ दिवसांत १ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. अनेक वर्षांपासून बंद असलेला हा कारखाना पुन्हा सुरू झाल्याने लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

यंदाच्या हंगामात कारखान्याने ३ ते ३.५ लाख कारखान्याचा साखर उतारा मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून, सध्या कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू आहे. १०.७५ टक्क्यांवर पोहोचला असून, तो अतिशय समाधानकारक मानला जात आहे. केंद्र व राज्य सरकारकडून मिळालेली मदत, बी. बी. ठोंबरे यांचे मार्गदर्शन आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा तांत्रिक सल्ला यामुळेच हे यश शक्य झाले आहे. संपूर्ण यंत्रणेचे नूतनीकरण कारखान्याची केल्याने कार्यक्षमता वाढली आहे.

श्री निळकंठेश्वराचे आशीर्वाद आणि शेतकरी बांधवांचा विश्वास याच्या बळावर हा कारखाना पुन्हा उभा राहिला आहे. ४४ दिवसांत १ लाख टन गाळप होणे ही सहकाराची ताकद आहे.

एकेकाळी मृतावस्थेत गेलेला निळकंठेश्वर कारखाना पुन्हा नव्या जोमाने उभा राहिला आहे. कारखान्याने गाळप क्षमतेसोबतच गुणवत्तेवरही लक्ष दिले असून, दैनंदिन साखर उताऱ्याने १२.०५ टक्क्यांपर्यंत मजल मारली आहे. आमदार अभिमन्यू पवार यांनी पाठपुरावा करून केंद्र व राज्य सरकारकडून आवश्यक निधी व तांत्रिक मदत मिळवून दिली. शेतकऱ्यांच्या हक्काचा कारखाना पुन्हा सुरू झाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळाली असून, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अहोरात्र कष्टाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande