हिंद-दी-चादर’ शहीदी समागम कार्यक्रमाच्या लातूर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
लातूर, 08 जानेवारी (हिं.स.)। येत्या २४ व २५ जानेवारी रोजी नांदेड येथे ''हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाविषयी लातूर जिल्ह्यात
हिंद-दी-चादर’ शहीदी समागम कार्यक्रमाच्या  जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी घेतला आढावा


लातूर, 08 जानेवारी (हिं.स.)।

येत्या २४ व २५ जानेवारी रोजी नांदेड येथे 'हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाविषयी लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागासह वाड्या-तांड्यावर जनजागृती करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे दिल्या. या अनुषंगाने राज्य शासनाकडून प्राप्त सूचनांवर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा त्यांनी आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, सामान्य प्रशासनच्या उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, शिक्षण उपसंचालक डॉ. दत्तात्रय मठपती, शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिषकुमार अय्यर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

'हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने राज्य शासनामार्फत तयार करण्यात आलेला माहितीपट जिल्ह्यातील शाळांमध्ये दाखविला जावा. तसेच या विषयावर आधारित निबंध लेखन, प्रश्नमंजुषा स्पर्धांचे आयोजन करावे. ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांपर्यंत या कार्यक्रमांची माहिती पोहोचणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जनजागृती मोहीम हाती घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी यावेळी दिल्या.

नांदेड येथे होणाऱ्या कार्यक्रमाला शीख, सिकलीकर, बंजारा, लबाना, मोहियाल, सिंधी, वाल्मिकी, उदासीन संप्रदाय आणि भगत नामदेव समाजातील भाविक नांदेड येथील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यावर राहणाऱ्या या भाविकांना नांदेड येथे जाणेकरिता वाहतूक सुविधा अथवा इतर वस्तू स्वरुपात मदत करण्यासाठी इच्छुक व्यक्तींनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande