‘द ब्लफ’च्या पोस्टरमध्ये दिसला प्रियंका चोपडा चा दमदार अवतार
मुंबई, 8 जानेवारी, (हिं.स.)। बॉलिवूडपासून हॉलीवूडपर्यंत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियंका चोपडा हिच्या बहुप्रतिक्षित ‘वाराणसी’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच प्रियंकाने चाहत्यांना सरप्राइज देत आपल्या आगामी आंतरराष्
‘द ब्लफ’च्या पोस्टरमध्ये दिसला प्रियंका चोपडा चा दमदार  अवतार


मुंबई, 8 जानेवारी, (हिं.स.)। बॉलिवूडपासून हॉलीवूडपर्यंत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियंका चोपडा हिच्या बहुप्रतिक्षित ‘वाराणसी’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच प्रियंकाने चाहत्यांना सरप्राइज देत आपल्या आगामी आंतरराष्ट्रीय चित्रपट ‘द ब्लफ’ची अधिकृत घोषणा केली आहे. या घोषणेसोबतच तिने चित्रपटातील आपली पहिली झलक शेअर केली असून, सोशल मीडियावर तिची जोरदार चर्चा रंगली आहे.

‘द ब्लफ’ या चित्रपटाची निर्मिती रुसो ब्रदर्स यांनी केली असून, दिग्दर्शनाची धुरा फ्रँक ई. फ्लावर्स यांनी सांभाळली आहे. हा चित्रपट १८व्या शतकाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. यात प्रियंका ‘एर्सेल बॉडेन’ या महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

समोर आलेल्या पोस्टरमध्ये प्रियंकाचा अतिशय खतरनाक आणि ताकदीचा अवतार पाहायला मिळतो. हातात तलवार घेतलेला तिचा लूक एखाद्या धाडसी योद्ध्या किंवा क्रूर समुद्री डाकूप्रमाणे भासतो. विशेष म्हणजे, या चित्रपटाची कथा कुख्यात समुद्री डाकू ‘ब्लड मेरी’पासून प्रेरित असल्याचे सांगितले जात आहे, त्यामुळे कथानक अधिकच रोमांचक ठरणार आहे.

प्रियंकाच्या या नव्या अवतारावर चाहत्यांकडून जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने, “खरंच धुमाकूळ घालायला सज्ज!” अशी प्रतिक्रिया दिली, तर दुसऱ्याने “वा! जबरदस्त लूक!” असे म्हटले आहे. सोशल मीडियावर अनेक जण प्रियंकाला या दमदार प्रोजेक्टसाठी शुभेच्छा देत आहेत.

‘द ब्लफ’ हा चित्रपट २५ फेब्रुवारी २०२६ रोजी Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande