बीड नगरपालिका निवडणूकीतील अनेक खर्चाचा हिशोब उमेदवारांनी दिलाच नाही
बीड, 09 जानेवारी (हिं.स.)। बीड नगरपालिका निवडणूकीतील खर्चाचा हिशोब अद्याप पर्यंत अनेक उमेदवारांनी दिला नाही खर्चाचा हिशोब तातडीने सादर करावा असे आवाहन करण्यात आली आहे. बीड नगरपरिषद निवडणूक-२०२५ अंतर्गत निवडणूक लढवलेल्या उमेदवारांनी आपल्या निवडणू
बीड नगरपालिका निवडणूकीतील अनेक खर्चाचा हिशोब उमेदवारांनी दिलाच नाही


बीड, 09 जानेवारी (हिं.स.)।

बीड नगरपालिका निवडणूकीतील खर्चाचा हिशोब अद्याप पर्यंत अनेक उमेदवारांनी दिला नाही खर्चाचा हिशोब तातडीने सादर करावा असे आवाहन करण्यात आली आहे.

बीड नगरपरिषद निवडणूक-२०२५ अंतर्गत निवडणूक लढवलेल्या उमेदवारांनी आपल्या निवडणूक खर्चाचा तपशील ठराविक कालावधीत सादर करावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, बीड यांनी केले आहे.

भारतीय लोकप्रतिनिधी अधिनियमातील तरतुदीनुसार निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल केल्यापासून मतमोजणी

दिनांकापर्यंत झालेल्या निवडणूक खर्चाचे हिशोबे विहित नमुन्यात सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार डिसेंबर २०२५ मध्ये पार पडलेल्या बीड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व २६ प्रभागांतील निवडणूक लढवलेल्या उमेदवारांनी आपला खर्चाचा तपशील दि.४ डिसेंबर २०२५ ते दि.३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत नोटीसनुसार सादर करणे आवश्यक आहे. अद्याप काही उमेदवारांनी आपला खर्चाचा तपशील सादर केलेला नसल्यास

त्यांनी तात्काळ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात हजर राहून आवश्यक कागदपत्रांसह खर्चाचा हिशोब सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सदर आदेशाचे पालन न केल्यास संबंधित उमेदवारांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. ज्यांनी हिशोब सादर केलेला आहे त्यांनी ते त्वरित सादर करावेत असे आवाहन उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande