
बीड, 09 जानेवारी (हिं.स.)।अंबाजोगाई येथील एका कार्यक्रमातउमाकांत गुंदेचा यांना शंकरबापू घृपद गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ध्रुपद गायकीतून देवाची आराधना केली जाते. या परंपरेला जीवंत ठेवण्यात गुंदेचा घराण्याचे मोठे योगदान आहे. असे प्रतिपादन एमआयटीचे कार्यकारी अध्यक्ष मंगेश कराड यांनी केले.
उमाकांत गुंदेचा यांना शंकरबापू धृपद गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. पद्मश्री शंकरबापू आपेगावकर धृपद गौरव पुरस्कार आंतरराष्ट्रीय ख्यातीचे धृपद गायक उमाकांत गुंदेचा आणि अनंत गुंदेचा यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी होते. निवृत्त आयुक्त उमाकांत दांगट, निवृत्त सिव्हिल सर्जन डॉ. व्ही. डी. जाधव, राज्य निवड मंडळाचे माजी
अध्यक्ष मधुकर कोकाटे, ज्येष्ठ नागरिक संघाचे राज्य अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे, पखवाज वादक उध्दवबापू आपेगा आपेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पुरस्काराचे स्वरूप शाल, सन्मानपत्र आणि रोख रक्कम असे होते. प्रारंभी धृपद संगीत मैफल झाली. उमाकांत आणि अनंत गुंदेचा यांनी शास्त्रीय गायन सादर केले. त्यांच्या गायनाने उपस्थित मंत्रमुग्ध झाले. उध्दवबापू आपेगावकर यांनी पखवाजवर साथ दिली. मीना सोमवंशी आणि कल्याण शिंदे यांनी तानपुर्यावर साथसंगत केली. कार्यक्रमात उपस्थितांनी पद्मश्री शंकरबापू आपेगावकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis