
बीड, 09 जानेवारी (हिं.स.)बीड येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या बलभीम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात पदवी व पदव्युत्तर मराठी विभाग आणि संशोधन केंद्राच्या वतीने बलभीम करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध नामांकित महाविद्यालयांतील ३८ स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट, सातारा येथील यशराज हेगडे याने प्रथम क्रमांक पटकावला.
द्वितीय क्रमांक श्री. शिवाजी विधी महाविद्यालय, परभणी येथील हनुमान आहेर याने तर तृतीय क्रमांक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथील तेजस पाटील याने मिळवला. दोन उत्तेजनार्थ पारितोषिके बलभीम महाविद्यालय, बीड येथील साक्षी कदम व सिद्धेश्वर महाविद्यालय, माजलगाव येथील विद्यार्थीनी मोहिनी पायघन यांनी प्राप्त केली. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक दहा हजार रूपये रोख, करंडक व प्रमाणपत्र, द्वितीय पारितोषिक सात हजार रूपये रोख, करंडक व प्रमाणपत्र, तृतीय पारितोषिकपाच हजार रूपये रोख, करंडक व प्रमाणपत्र तर दोन उत्तेजनार्थ पारितोषिकांत प्रत्येकी एक हजार रूपये रोख व प्रमाणपत्र असे स्वरूप होते. तर सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. या पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे बीड जिल्हा दामिनी पथक प्रमुख पीएसआय पल्लवी जाधव, उपप्राचार्य डॉ. बाबासाहेब कोकाटे, डॉ. संतोष डुबल, आय. क्यु. ए. सी. समन्वयक डॉ. अनिल चिंघे, मराठी विभागप्रमुख डॉ. मनोहर सिरसाट यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांनापारितोषिके देण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. न.पु. काळे, दिपक मुळे व सुरेश जाधव यांनी काम पाहिले.
----------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis