केटीएम आरसी 160 भारतात लॉन्च
मुंबई, 09 जानेवारी (हिं.स.)। स्पोर्ट्स बाईक निर्माता कंपनी केटीएम इंडियाने भारतीय बाजारात नवी केटीएम आरसी 160 फेयर्ड मोटरसायकल लाँच केली आहे. काही महिन्यांपूर्वी कंपनीने केटीएम 160 ड्युक बाजारात आणली होती आणि आता आपल्या 160 लाइनअपचा विस्तार करत आरस
KTM RC 160


मुंबई, 09 जानेवारी (हिं.स.)। स्पोर्ट्स बाईक निर्माता कंपनी केटीएम इंडियाने भारतीय बाजारात नवी केटीएम आरसी 160 फेयर्ड मोटरसायकल लाँच केली आहे. काही महिन्यांपूर्वी कंपनीने केटीएम 160 ड्युक बाजारात आणली होती आणि आता आपल्या 160 लाइनअपचा विस्तार करत आरसी 160 सादर करण्यात आली आहे. या मोटरसायकलची किंमत 1.85 लाख रुपये एक्स-शोरूम ठेवण्यात आली असून ती आरसी 200 आणि आरसी 390 पेक्षा खालच्या सेगमेंटमध्ये येत असल्यामुळे केटीएमच्या आरसी सुपरस्पोर्ट रेंजमध्ये एंट्री पॉइंटची भूमिका बजावते.

केटीएम आरसी 160 मध्ये 164.2 सीसी लिक्विड-कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे, हेच इंजिन 160 ड्युकमध्ये वापरले जाते. हे इंजिन 9,500 आरपीएमवर 18.7 बीएचपी शक्ती आणि 7,500 आरपीएमवर 15.5 एनएम टॉर्क निर्माण करते. या इंजिनला 6-स्पीड गिअरबॉक्स आणि स्लिप-अँड-असिस्ट क्लच जोडण्यात आला आहे. कंपनीच्या मते या बाईकची टॉप स्पीड 118 किमी प्रतितास आहे. सायकल पार्ट्समध्ये 37 मिमी अपसाइड-डाउन फ्रंट फोर्क्स आणि रिअर मोनोशॉक सस्पेन्शन दिले गेले आहेत.

बाईकमध्ये 17 इंचांचे अलॉय व्हील्स असून त्यावर ट्यूबलेस टायर्स बसवले आहेत. पुढे 110/70 आणि मागे 140/60 सेक्शनचे टायर्स देण्यात आले आहेत. ब्रेकिंगसाठी 320 मिमीची फ्रंट डिस्क आणि 230 मिमीची रिअर डिस्क दिली असून ड्युअल-चॅनल एबीएसची सुविधाही आहे. इंधन टाकीची क्षमता 13.75 लिटर इतकी आहे. फीचर्सच्या बाबतीत केटीएमच्या खास स्टाइलमध्ये आरसी 160 मध्ये हेडलाइट, टेललॅम्प आणि इंडिकेटर्ससह पूर्णपणे एलईडी लाइटिंग देण्यात आली आहे तसेच एलसीडी इंस्ट्रुमेंट क्लस्टर उपलब्ध आहे. 160 ड्युकला नुकतेच टीएफटी डिस्प्ले मिळाले असले तरी आरसी 160 साठी कंपनी भविष्यात नवा व्हेरिएंट आणेल का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

कंपनीने ही मोटरसायकल 1.85 लाख रुपयांना बाजारात उतरवली असून ती 160 ड्युकपेक्षा सुमारे 15 हजार रुपये महाग आहे. तसेच आपल्या प्रमुख प्रतिस्पर्धी यामाहा R15 पेक्षा सुमारे 19 हजार रुपये जास्त किमतीची आहे. अलीकडेच यामाहा R15 च्या किमतीत 5 हजार रुपयांची कपात करण्यात आली होती, त्यामुळे नवीन केटीएम आरसी 160 भारतीय स्पोर्ट्स बाईक सेगमेंटमध्ये स्पर्धेला नवे वळण देणार असल्याचे मानले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande