परभणी - सेलू तालुक्यातील तिघांवर हद्दपारीची कारवाई; दंडाधिका-यांचा आदेश
परभणी, 01 ऑक्टोबर, (हिं.स.)। सेलू तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी शैलेश लाहोटी यांनी तीन इसमांवर हद्दपारीची कारवाई केली आहे. संबंधित तिघांना परभणी व जालना जिल्ह्यातील मंठा व परतूर तालुका क्षेत्रातून अनुक्रमे ए
परभणी - सेलू तालुक्यातील तिघांवर हद्दपारीची कारवाई; दंडाधिका-यांचा आदेश


परभणी, 01 ऑक्टोबर, (हिं.स.)। सेलू तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी शैलेश लाहोटी यांनी तीन इसमांवर हद्दपारीची कारवाई केली आहे. संबंधित तिघांना परभणी व जालना जिल्ह्यातील मंठा व परतूर तालुका क्षेत्रातून अनुक्रमे एक व दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैभव दिनकर खेडेकर (रा. शिराळा, ता. सेलू) याच्याविरुद्ध गौण खनिज चोरी, मारहाण, दुखापत, दंगा, धमकावणे आदी स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल आहेत. या पार्श्वभूमीवर त्याला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. राजू विजय धापसे (रा. शाहूनगर, सेलू) याच्याविरुद्ध विनयभंग, दुखापत, दंगा, प्राणघातक हत्याराने दंगा तसेच सार्वजनिक शांतता भंगासंदर्भातील चार गुन्हे दाखल आहेत. त्याला एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. इमरान कुरेशी ऊर्फ इब्राहिम शेख पाशा कुरेशी (रा. कुरेशी मोहल्ला, सेलू) याच्याविरुद्ध मारहाण, दुखापत, दंगा, धमकावणे, शिवीगाळ, चोरी आदी स्वरूपाचे सात गुन्हे दाखल असल्याने त्यालाही एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. सेलू पोलिस ठाणे व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त प्रस्तावांमधील कागदपत्रांची छाननी करण्यात आली. तसेच संबंधितांना आपली बाजू मांडण्यासाठी सुनावणीची संधी दिल्यानंतर उपविभागीय दंडाधिकार्यांनी हद्दपारीचे आदेश जारी केले. दरम्यान, उपविभागीय दंडाधिकारी शैलेश लाहोटी यांनी मागील नऊ महिन्यांत सेलू व जिंतूर तालुक्यातील 28 इसमांविरुद्ध हद्दपारीची कारवाई केल्याची माहिती देण्यात आली आहे. कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या अन्य प्रस्तावांवरही सुनावणी घेऊन नियमानुसार पुढील आदेश जारी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande