
नाशिक, 01 ऑक्टोबर (हिं.स.)।
- घरात झोपलेल्या महिलेच्या घरात प्रवेश करून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला ही मुरलीधरनगर, पाथर्डी फाटा येथील घरी रात्री झोपलेली होती. त्यावेळी आरोपी राजेश अंबुरे (रा. मुरलीधरनगर, पाथर्डी फाटा, नाशिक) याने घरात प्रवेश केला. तिला मिठी मारून “शांत बस, नाही तर तुला मारून टाकीन, तू मला खूप आवडतेस, असे म्हणून तिचे तोंड दाबून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अंबुरे याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI