अफगाणिस्तानच्या हेलमंदमध्ये पाकिस्तानचा हवाई हल्ला; २२ जणांचा मृत्यू
इस्लामाबाद , 01 ऑक्टोबर (हिं.स.)।अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सीमेवर सुरू असलेला वाद दिवसेंदिवस अधिक चिघळत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानने गुरुवारी अफगाणिस्तानच्या हेलमंद प्रांतात मोठा हवाई हल्ला केला.या हल्ल्यात २२ जणांचा मृत्यू झ
अफगाणिस्तानच्या हेलमंदमध्ये पाकिस्तानचा हवाई हल्ला; २२ जणांचा मृत्यू


इस्लामाबाद , 01 ऑक्टोबर (हिं.स.)।अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सीमेवर सुरू असलेला वाद दिवसेंदिवस अधिक चिघळत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानने गुरुवारी अफगाणिस्तानच्या हेलमंद प्रांतात मोठा हवाई हल्ला केला.या हल्ल्यात २२ जणांचा मृत्यू झाला असून, ११ हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक प्रांतीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनंतर पाकिस्ताननेही या हवाई हल्ल्याची पुष्टी केली आहे.

पाकिस्तान सरकारने मृत्युमुखी पडलेल्या सर्व व्यक्तींना दहशतवादी असल्याचा दावा केला आहे. हेलमंद प्रांताच्या माहिती आणि संस्कृती विभागाचे प्रमुख मौलाना शेर मोहम्मद वहदत यांनी वृत्तसंस्थाला सांगितले की, पाकिस्तानी लष्कराकडून हेलमंदमधील गरमसिर जिल्ह्यातील दोन निवासी घरांना लक्ष्य करून हे हवाई हल्ले करण्यात आले.

मात्र, प्राथमिक आकडेवारीनुसार या भीषण हल्ल्यात चार निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तसेच जखमी झालेल्यांमध्ये बहुतांश महिला आणि लहान मुलांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande