लाहोरमधील ऐतिहासिक नेहरू पार्कचा जीर्णोद्धार सुरू
इस्लामाबाबद, 01 ऑक्टोबर (हिं.स.)।पाकिस्तानातील लाहोरच्या कृष्णा नगर परिसरात असलेल्या ऐतिहासिक नेहरू पार्कच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू झाले आहे.हे ठिकाण भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित महत्त्वाचे स्थळ मानले जाते. ३१ डिसेंबर १९२९ रोजी भारतीय राष्ट
लाहोरमधील ऐतिहासिक नेहरू पार्कचा जीर्णोद्धार सुरू


इस्लामाबाबद, 01 ऑक्टोबर (हिं.स.)।पाकिस्तानातील लाहोरच्या कृष्णा नगर परिसरात असलेल्या ऐतिहासिक नेहरू पार्कच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू झाले आहे.हे ठिकाण भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित महत्त्वाचे स्थळ मानले जाते. ३१ डिसेंबर १९२९ रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ऐतिहासिक लाहोर अधिवेशनात ज्या ठिकाणी ‘पूर्ण स्वराज्य’चा ठराव मंजूर करण्यात आला होता, त्याच ठिकाणी नेहरू पार्क उभारण्यात आले आहे. तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष जवाहरलाल नेहरू यांनी याच ठिकाणी भारतीय ध्वज फडकावला होता.

पार्क्स अँड हॉर्टिकल्चर अथॉरिटीचे महासंचालक अहमद उस्मान जावेद यांनी सांगितले की, या पार्कचे संपूर्ण पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. पार्कला नवा लूक देण्यासाठी हिरवळ आणि हंगामी फुलांची लागवड केली जात आहे. तसेच रात्रीच्या वेळी आकर्षक रोषणाई, बाके आणि मुलांसाठी झोपाळेही बसवण्यात येणार आहेत.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पार्कच्या संरक्षक भिंतीची दुरुस्ती करण्यासोबतच सजावटीची झाडे आणि कारंजेही उभारण्यात येणार आहेत. याशिवाय क्रिकेट पॅव्हिलियन बांधण्याचीही योजना आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande