सटाण्यात मोकाट कुत्र्यांनी घेतला १५ जणांना चावा , जखमींवर नाशिकमध्ये उपचार
सटाणा, 01 ऑक्टोबर (हिं.स.) नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड नंतर आता सटाणा शहरामध्ये देखील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झाला असून या ठिकाणी मोकाट कुत्र्याने 15 नागरिकांना चावा घेतल्यानंतर कुत्र्याच्याही मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे शहरातील मोकाट
सटाण्यात मोकाट कुत्र्यांनी घेतला १५ जणांना चावा , जखमींवर नाशिकमध्ये उपचार


सटाणा, 01 ऑक्टोबर (हिं.स.) नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड नंतर आता सटाणा शहरामध्ये देखील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झाला असून या ठिकाणी मोकाट कुत्र्याने 15 नागरिकांना चावा घेतल्यानंतर कुत्र्याच्याही मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे

शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पुंडलिक नगर परिसरात एका मोकाट कुत्र्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांसह सुमारे १५ नागरिकांना चावा घेतल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या काही नागरिकांवर सटाणा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत असून, काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नाशिक येथे पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे . एकाच परिसरात अनेक नागरिकांना कुत्र्याने चावा घेतल्याने नागरिकांमध्ये संतापासह घबराटीचे वातावरण आहे.

पालिका कर्मचाऱ्यांनी परिसरात शोध घेतला असता नागरिकांना चावा घेतलेला संबंधित कुत्रा मृतावस्थेत आढळून आला. कर्मचाऱ्यांनी मृत कुत्र्याची विल्हेवाट लावली. तसेच परिसराची स्वच्छता करून निर्जंतुकीकरणासाठी पावडर टाकण्यात आली. परिसरातील इतर मोकाट कुत्र्यांबाबतही पाहणी घेऊन आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande