गांजा बाळगणाऱ्या तिघांना रत्नागिरीत अटक
रत्नागिरी, 11 ऑक्टोबर (हिं.स.) । येथील उद्यमनगर परिसरातील महिला हॉस्पिटलजवळ तिघा तरुणांना गांजा बाळगल्याचे आढळल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. काल मध्यरात्रीनंतर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल दिनेश पांडुरंग आखाडे महिला रुग्णालय ते चं
गांजा बाळगणाऱ्या तिघांना रत्नागिरीत अटक


रत्नागिरी, 11 ऑक्टोबर (हिं.स.) । येथील उद्यमनगर परिसरातील महिला हॉस्पिटलजवळ तिघा तरुणांना गांजा बाळगल्याचे आढळल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

काल मध्यरात्रीनंतर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल दिनेश पांडुरंग आखाडे महिला रुग्णालय ते चंपक मैदान यादरम्यान गस्त घालत होते. तेव्हा त्यांना तालुका लघुपशुवैद्यकीय चिकित्सालयाजवळ साहिल समीर सोलकर (वय 27, राहणार कोकण नगर, रत्नागिरी), सुफियान अनिस गुहागरकर (वय 25, मूळ राहणार पडवे, दखनी मोहल्ला, तालुका गुहागर, सध्या राहणार आझाद नगर, कोकण नगर, रत्नागिरी आणि यशराज राजेश देसाई (वय 24, राहणार गणेश कॉलनी, हातखंबा, रत्नागिरी) संशयास्पद हालचाली करताना दिसले. त्यांची चौकशी आणि तपासणी केली असता त्यांच्याकडे सुमारे सव्वा लाख किमतीचा 34.50 ग्रॅम गांजा, पावणेदोन लाखाची बजाज कंपनीची मॅक्सिमा रिक्षा, सव्वा लाखाची सुझुकी दुचाकी सापडली. त्यांनी विक्री करण्याच्या उद्देशाने गांजा बाळगल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande