
लातूर, 11 ऑक्टोबर (हिं.स.)।
४० वा गळीत हंगाम व बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ उत्साहात संपन्न
राज्याच्या साखर कारखानदारीत नावलौकिक असलेल्या
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ मधील ४० व्या गळीत हंगामासाठी गाळपाला येणाऱ्या उसाला प्रति मे.टन ३ हजार रुपये पहिला हप्ता देण्यात येणार असल्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन दिलीपराव देशमुख साहेब यांनी केली. ते रविवारी साखर कारखान्याच्या ४० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ त्यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्निप्रदीपन तसेच गव्हाणीत उसाची मोळी टाकून करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते
*५ लाख मेट्रिक टन ऊस गाळप उद्दिष्ट*
यावेळी बोलताना आदरणीय दिलीपराव देशमुख यांनी चालू गळीत हंगामासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या व सध्या दुष्काळी परिस्थिती असली तरी कारखाना चालू गळीत हंगामासाठी ४ लाख ५० हजार हजार ते ५ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्याला द्यावा असे आवाहन देशमुख यांनी केले आहे
यावेळी विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार माजी आमदार वैजनाथदादा शिंदे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन रेणाचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक काळे यांनी आपल्या मनोगतातून कारखान्याच्या वाटचालीचा गौरव केला तसेच आगामी गळीत हंगामासाठी शुभेच्छा दिल्या.
*विविध धार्मिक विधी संपन्न*
कारखाना स्थळी कार्यक्रमाच्या प्रारंभी बॉयलर पूजनाचा विधी संचालक निळकंठ बचाटे यांच्या हस्ते, गव्हाण पूजन तज्ज्ञ संचालक सुरेश चव्हाण यांच्या हस्ते, तर श्री गणेश मंदिर व मांजरेश्वर हनुमान अभिषेक पूजन तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष तानाजी जाधव यांच्या हस्ते सपत्नीक पार पडला.
कार्यक्रमास विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार वैजनाथ शिंदे, माजी चेअरमन धनंजय देशमुख, माजी संचालक शंकरराव चव्हाण, रेणाचे माजी अध्यक्ष यशवंतराव पाटील, बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, ट्वेन्टी वन शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष अनंतराव देशमुख मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष शाम भोसले रेणा चे माजी अध्यक्ष सर्जेराव मोरे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी ऊस उत्पादक शेतकरी आदींची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis