लातूर - संत गोपाळबुवा महाराज साखर कारखान्याचा गळीत शुभारंभ
लातूर, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। शेतकऱ्यांच्या हितासाठी दिमाखाने उभा असलेल्या लातूर तालुक्यातील मौजे रामेश्वर येथील संत श्री गोपाळबुवा महाराज शुगर अँन्ड ॲग्रो फुड इंडस्ट्रीज प्रा. लि. रामेश्वर या साखर कारखान्याचा द्वितीय गळीत हंगामाचा शुभारंभ 11 ऑक्टोब
राजेश कराड


लातूर, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। शेतकऱ्यांच्या हितासाठी दिमाखाने उभा असलेल्या लातूर तालुक्यातील मौजे रामेश्वर येथील संत श्री गोपाळबुवा महाराज शुगर अँन्ड ॲग्रो फुड इंडस्ट्रीज प्रा. लि. रामेश्वर या साखर कारखान्याचा द्वितीय गळीत हंगामाचा शुभारंभ 11 ऑक्टोबर 2026 रविवार रोजी घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आला. दुसऱ्याच वर्षी गाळपास येणाऱ्या उसाला प्रति टन एक रक्कमी 3351 रुपये एवढा विक्रमी भाव देण्याची घोषणा करण्यात आली. केवळ शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करण्यासाठी कारखान्याची उभारणी केली असल्याची माहिती चेअरमन राजेश कराड यांनी दिली.

लातूर ग्रामीण मतदार संघातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आग्रहातर उभारणी करण्यात आलेल्या रामेश्वर परिसरात संत श्री गोपाळबुवा महाराज शुगर अँन्ड ॲग्रो फुड इंडस्ट्रीज प्रा. लि. रामेश्वर या साखर कारखान्याचा चालू वर्षीचा गळीत हंगाम शुभारंभ 11 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर गळीत हंगामाचा शुभारंभ हभप नारायण महाराज उत्तरेश्वर पिंपरी, हभप हरिहर महाराज दिवेगावकर, हभप बाबा महाराज बोराडे काटगावकर आणि हभप लालासाहेब पवार महाराज देवळेकर यांच्या शुभहस्ते उसाची मुळी गव्हाणीच टाकून करण्यात आला. याप्रसंगी कारखान्याचे मुख्य प्रवर्तक तुळशीरामअण्णा कराड, काशीरामनाना कराड, अंबा कारखान्याचे दत्ताआबा पाटील, बालासाहेबतात्या कराड, चेअरमन राजेश कराड, राजाभाऊ औवताडे, सांगायो समिती अध्यक्ष बन्सी भिसे, पाणंद व शेत रस्ता समिती सहअध्यक्ष सुरज शिंदे, उपसभापती शरद दरेकर, भाजपाचे प्रताप पाटील, महेंद्र गोडभरले, अनिल भिसे, कमलाकर कोपले, साहेबराव मुळे, गोपाळ पाटील, विश्वास कावळे, मनोज कराड, पद्माकर चिंचोलकर, राजकिरण साठे, गोविंद नरहरे, विजय काळे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी ऋषिकेश कराड, देवेंद्र कराड, रणवीर कराड यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.

कारखान्याच्या प्रगतीत शेतकऱ्याची प्रगती आहे आणि शेतकऱ्याच्या प्रगतीत राष्ट्राची गती आहे. शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन शेतकऱ्याचे दुःख, वेदना जाणून शेतकरी हितासाठी कराड परिवाराने कारखान्याची उभारणी केली. या परिवाराला संत महात्म्यांचे आशीर्वाद असून या कारखान्याची भरभराट होईल अशा सदिच्छा देऊन याप्रसंगी हभप नारायण महाराज उत्तरेश्वर पिंपरी, हभप हरिहर महाराज दिवेगावकर, हभप बाबा महाराज बोराडे काटगावकर यांनी दुष्काळाचे संकट नाहीसे व्हावे अशी प्रार्थना केली.

कारखान्याची चेअरमन राजेश कराड यांनी आपला कारखाना कोणाशी स्पर्धा न करता योग्य दिशेने वाटचाल करीत असल्याचे सांगून यावर्षी गाळपास येणाऱ्या 11 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरच्या उसाला 3151 रुपये, 1 डिसेंबर ते 15 जानेवारी दरम्यानच्या उसाला 3251 आणि 15 जानेवारी नंतर येणाऱ्या उसाला 3351 रुपये भाव देणार असल्याची घोषणा करून यावर्षी दिवाळी करिता शेतकरी सभासद आणि गेल्या वर्षी ऊस दिलेल्या शेतकऱ्यांना 30 रुपये दराने 10 किलो गूळ पावडर देण्यात येईल. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना सात टक्के पगार वाढ आणि दहा टक्के दिवाळी बोनस देण्याची घोषणा केली. ऊसतोड मजुरांना दरवर्षी दिवाळी फराळाचे वाटप केले जाईल असे बोलून दाखवले.

संत गोपाळ बुवा महाराज साखर कारखान्याची उभारणी केवळ शेतकऱ्याची हित डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली आहे. बाहेरील कुठल्याही वजन काट्यावर उसाचे वजन करून आणा आपल्या कारखान्याच्या वजन काट्यात फरक पडला तर त्याच दिवशी कारखाना बंद केला जाईल असे सांगून राजेश कराड उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले.

गळीत हंगाम शुभारभ सोहळ्यास रवींद्र काळदाते, बाबासाहेब घुले, बालासाहेब शेप, भैरवनाथ पिसाळ, बाबा भिसे, अशोक सावंत, भागवत गीते, बालासाहेब कदम, प्रशांत पाटील, धनंजय जाधव, आदिनाथ मुळे, किरण मुंडे, शुभम खोसे, बालाजी गवळी, ज्ञानेश्वर माचवे, अंकुश गंणगे, गोविंद मुंडे, कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आणि कारखान्याच्या भागधारकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande