
लातूर, 11 ऑक्टोबर (हिं.स.)।
अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून पुढील हंगामाची चिंता निर्माण झाली आहे या दुष्काळी परिस्थितीतून शेतकऱ्याला बाहेर काढा अशी प्रार्थना असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रेणापूर येथील आदिशक्ती श्री रेणुका मातेच्या चरणी भाजपाच्या सौ संजीवनीताई रमेशआप्पा कराड यांनी घटस्थापनेच्या निमित्ताने केली.
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी रेणापूर येथील श्री.रेणुकादेवी मंदिरात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत असून 11 ऑक्टोबर रविवार रोजी दुपारी 1 वाजता सौ संजीवनीताई रमेशआप्पा कराड यांच्या उपस्थितीत. मंदिरात घटस्थापना करण्यात आली. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, रेणापूरचे तहसीलदार प्रशांत थोरात, संदीप पाटील, औसा तहसीलदार घनश्याम अडसूळ, पोलीस निरीक्षक देडे देवस्थानचे सहअध्यक्ष राम पाटील यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.
मोठ्या उत्साहाच्या भक्तिमय वातावरणात श्रीकांत धर्माधिकारी यांच्या मंत्रोपचाराने विविध वाजंत्रीच्या गजरात विधीवत घटस्थापना करण्यात आली. याप्रसंगी रेणापूर येथील तरुणांनी तुळजापूरहून आणलेल्या ज्योती चे स्वागत करण्यात आले. रेणुका देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने सौ संजीवनीताई रमेशआप्पा कराड यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला दिलासा मिळावा, संकट दूर होऊन नवी संजीवनी मिळावी अशी प्रार्थना याप्रसंगी रेणुका मातेकडे सौ संजीवनीताई रमेशआप्पा कराड यांनी केली. यावेळी मंदिर ट्रस्टचे रमाकांत वाघमारे, तुकाराम कोल्हे, विठ्ठल कटके, रावसाहेब राठोड, मनोहर व्यवहारे शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, मंदिराचे सर्व पुजारी सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis