पुढील आठवड्यात प्रायमरी मार्केटमध्ये ७ नवे आयपीओ; केवळ एका कंपनीचे शेअर्स होणार लिस्ट
नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। सोमवार, १२ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या व्यापारी आठवड्यात आयपीओ लाँचिंगच्या दृष्टीने सामान्य हालचाल पाहायला मिळणार आहे. सोमवार ते शुक्रवारद रम्यान सात कंपन्या आपले पब्लिक इश्यू लाँच करणार आहेत. यापैकी पाच कंपन्या मेन
New IPO Launching Listing


नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। सोमवार, १२ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या व्यापारी आठवड्यात आयपीओ लाँचिंगच्या दृष्टीने सामान्य हालचाल पाहायला मिळणार आहे. सोमवार ते शुक्रवारद रम्यान सात कंपन्या आपले पब्लिक इश्यू लाँच करणार आहेत. यापैकी पाच कंपन्या मेनबोर्ड सेगमेंटमधील, तर उर्वरित दोन कंपन्या एसएमई सेगमेंटमधील आहेत. शेअर्सच्या लिस्टिंगच्या दृष्टीने हा आठवडा मात्र सुस्त राहणार आहे. या आठवड्यात केवळ एका कंपनीचे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट होऊन व्यवहाराला सुरुवात करणार आहेत.

आठवड्याच्या दुसऱ्या व्यापारी दिवशी, १३ ऑक्टोबर रोजी एचडी फायर प्रोजेक्टचा ७१२.३१ कोटी रुपयांचा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे. या इश्यूमध्ये १५ ऑक्टोबरपर्यंत बोली लावता येईल. आयपीओसाठी प्रति शेअर २५८ ते २७१ रुपये असा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे, तर लॉट साइज ५५ शेअर्सचा आहे. आयपीओ बंद झाल्यानंतर २१ ऑक्टोबर रोजी बीएसई आणि एनएसईवर कंपनीचे शेअर्स लिस्ट होण्याची शक्यता आहे.

याच दिवशी रविता इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचा ११६.०५ कोटी रुपयांचा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल. या इश्यूमध्येही १५ ऑक्टोबरपर्यंत बोली लावता येईल. आयपीओसाठी प्रति शेअर १०५ ते ११२ रुपये असा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे, तर लॉट साइज १,२०० शेअर्सचा आहे. आयपीओ बंद झाल्यानंतर २१ ऑक्टोबर रोजी एनएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर कंपनीचे शेअर्स लिस्ट होण्याची शक्यता आहे.

मंगळवारी, १३ ऑक्टोबर रोजीच वैभव व्यापारचा ४२.१० कोटी रुपयांचा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल. या इश्यूमध्येही १५ ऑक्टोबरपर्यंत बोली लावता येईल. आयपीओसाठी प्रति शेअर ५१ ते ५४ रुपये असा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे, तर लॉट साइज २,००० शेअर्सचा आहे. आयपीओ बंद झाल्यानंतर २१ ऑक्टोबर रोजी एनएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर कंपनीचे शेअर्स लिस्ट होण्याची शक्यता आहे.

त्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी फ्युजन सीएक्स लिमिटेडचा ७०२ कोटी रुपयांचा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल. या इश्यूमध्ये १६ ऑक्टोबरपर्यंत बोली लावता येईल. आयपीओसाठी प्रति शेअर २७५ ते २८९ रुपये असा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे, तर लॉट साइज ५१ शेअर्सचा आहे. आयपीओ बंद झाल्यानंतर २२ ऑक्टोबर रोजी बीएसई आणि एनएसईवर कंपनीचे शेअर्स लिस्ट होण्याची शक्यता आहे.

आठवड्याच्या चौथ्या कारोबारी दिवशी, १५ ऑक्टोबर रोजी सहजानंद मेडिकल टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ लाँच होणार आहे. या इश्यूमध्ये १९ ऑक्टोबरपर्यंत बोली लावता येईल. सध्या या आयपीओसाठी प्राइस बँड आणि लॉट साइज जाहीर करण्यात आलेला नाही. आयपीओअंतर्गत एकूण २,७६,४४,२३१ शेअर्स ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून विकले जाणार आहेत. आयपीओ बंद झाल्यानंतर २३ ऑक्टोबर रोजी बीएसई आणि एनएसईवर कंपनीचे शेअर्स लिस्ट होण्याची शक्यता आहे.

याच दिवशी टोन्बो इमेजिंग इंडियाचा आयपीओदेखील लाँच होणार आहे. या इश्यूमध्येही १९ ऑक्टोबरपर्यंत बोली लावता येईल. सध्या या आयपीओसाठी प्राइस बँड आणि लॉट साइज जाहीर करण्यात आलेला नाही. आयपीओअंतर्गत एकूण १,२१,७४,०४६ शेअर्स ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून विकले जाणार आहेत. आयपीओ बंद झाल्यानंतर २३ ऑक्टोबर रोजी बीएसई आणि एनएसईवर कंपनीचे शेअर्स लिस्ट होण्याची शक्यता आहे.

याशिवाय, जेटवर्क मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस लिमिटेडचा आयपीओदेखील १५ ऑक्टोबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे. या इश्यूमध्येही १९ ऑक्टोबरपर्यंत बोली लावता येईल. सध्या या आयपीओसाठी प्राइस बँड, लॉट साइज आणि इश्यूचा आकार जाहीर करण्यात आलेला नाही. आयपीओ बंद झाल्यानंतर २३ ऑक्टोबर रोजी बीएसई आणि एनएसईवर कंपनीचे शेअर्स लिस्ट होण्याची शक्यता आहे.

नव्या आठवड्यात १२ ऑक्टोबर रोजी बीएसई आणि एनएसईवर आरके फॅशन अॅक्सेसरीजचे शेअर्स लिस्ट होणार आहेत. कंपनीचा ३४.९९ कोटी रुपयांचा आयपीओ ५ ते ७ ऑक्टोबरदरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला होता. या आयपीओला एकूण २.७० पट सबस्क्रिप्शन मिळाले होते. यामध्ये क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्ससाठी राखीव असलेला हिस्सा १४.११ पट, नॉन-इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्ससाठी राखीव हिस्सा १.७७ पट, तर रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी राखीव हिस्सा ३.११ पट सबस्क्राइब झाला होता. या आयपीओसाठी प्रति शेअर ७७ ते ८२ रुपये असा प्राइस बँड निश्चित करण्यात आला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande