
मुंबई, 11 ऑक्टोबर (हिं.स.) - टाटा स्टील कलर्स प्रायव्हेट लिमिटेडने (टीएससीपीएल) भारतात जगभरात ओळखल्या जाणाऱ्या कलरकोट श्रेणीतील प्री-पेंटेड स्टील उत्पादने सुरू केल्याची घोषणा केली . त्यायोगे देशाच्या वाढत्या पायाभूत सुविधा क्षेत्रात काही दशकांची युरोपियन निपुणता, प्रगत तंत्रज्ञान आणि सिद्ध इमारत कवच उपाय सादर करत आहे.
कलरकोट हे भारतासाठी खास करून तयार केलेल्या प्रगत कोटिंग तंत्रज्ञानासोबत विकसित केले आहे आणि टिकाऊपणा, सौंदर्य, उष्णतेत कामगिरी व शाश्वतता यांचा संगम यात साधला गेला आहे जे भारतातील विविध बांधकाम वापरांसाठी आवश्यक आहे. कलरकोटला निसर्गाच्या चिरस्थायी सुंदरतेने प्रेरणा लाभली असून त्यात काळजीपूर्वक निवडलेले रंग व सिद्ध कामगिरी एकत्र पहायला मिळते. यामुळे दोन्ही, बोलकी व लवचिक अशी वास्तुकला निर्माण होते.
त्याचे प्रगत कोटिंग तंत्रज्ञान गरम आणि उबदार हवामानासाठी तयार करण्यात आले असून ते उत्कृष्ट रंग व चमक टिकवते, गंज आणि कापलेल्या किनाऱ्यांपासून संरक्षण करते, ओरखड्यांपासून बचाव करते व दीर्घकालीन सौंदर्य टिकवून ठेवते. वास्तुविशारद व विकासक यांना याच्या रंग व फिनिशच्या बहुमुखी प्रकारांमुळे अधिक डिझाइन लवचीकता लाभते. कलरकोट® ची उत्पादने जमशेदपूर मधील अत्याधुनिक सुविधेत तयार केली जात असून टीएससीपीएल ती भारतात आणि परदेशात तयार करणार आहे, त्यांचे वितरण आणि विपणन करणार आहे व त्यायोगे जागतिक तंत्रज्ञान आणि निपुणता यांना स्थानिक प्रवेश प्रदान करत आहे.
श्री. प्रवीन व्ही. थम्पी, व्यवस्थापकीय संचालक, टाटा स्टील कलर्स यांनी सांगितले की, भारतात भविष्यासाठी तयारी केली जात असताना प्रत्येक बाबतीत, म्हणजेच, टिकाऊपणा, डिझाइन आणि पर्यावरणीय कामगिरी दाखवू शकणाऱ्या साहित्यांची गरज उद्योग आणि समुदायांना आहे. जागतिक पटलावर नवीन मानके निर्माण करण्यास मदत करतील असे प्रगत जागतिक उपाय उपलब्ध करून देण्याचे उद्दीष्ट आम्ही ठेवले आहे. टाटा स्टील कलर्स गर्वाने जागतिक पातळीवर प्रशंसा लाभलेले उपाय देशांतर्गत व जागतिक बाजारपेठेत सादर करत असून वास्तुविशारद व विकासक यांना भविष्यासाठी डिझाइन करण्यास सामर्थ्य प्रदान करत आहे.
त्याचे छप्पर व भिंतींना आच्छादन पुरवणारे उपाय विविध प्रकारच्या वापरांसाठी अनुकूल आहेत आणि त्यात सामील आहेत - मेट्रो आणि वाहतूक पायाभूत सुविधा, बंदरे आणि गोदामे, वितरण केंद्रे, उत्पादन आणि ऑटोमोटिव्ह सुविधा, व्यावसायिक जागा, संरक्षण आणि आधुनिक संस्थात्मक प्रकल्प.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी