दुर्मिळ जन्मजात हृदयस्थितीवर अशोका मेडिकव्हरमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया
‘सिटस इनव्हर्सस विथ डेक्स्ट्रोकार्डिया’ असलेल्या महिलेवर उपचार नाशिक, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। : हृदय आणि छाती-पोटातील अंतर्गत अवयवांची रचना सामान्य रचनेच्या उलट असलेल्या दुर्मिळ जन्मजात स्थितीतील महिलेवर अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये हृदयाच्या झडपे
Successful surgery at Ashoka


‘सिटस इनव्हर्सस विथ डेक्स्ट्रोकार्डिया’ असलेल्या महिलेवर उपचार

नाशिक, 11 ऑक्टोबर (हिं.स.)।

: हृदय आणि छाती-पोटातील अंतर्गत अवयवांची रचना सामान्य रचनेच्या उलट असलेल्या दुर्मिळ जन्मजात स्थितीतील महिलेवर अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये हृदयाच्या झडपेची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णाच्या इतर शारीरिक गुंतागुंतींमुळे आव्हानात्मक ठरलेली ही शस्त्रक्रिया तज्ज्ञांच्या समन्वयातून यशस्वी झाली.

‘सिटस इनव्हर्सस विथ डेक्स्ट्रोकार्डिया’ या स्थितीत हृदयाचा अग्रभाग उजव्या बाजूला असतो, तर छाती व पोटातील अंतर्गत अवयवांची रचना आरशातील प्रतिमेप्रमाणे असते. ही स्थिती साधारणतः १५ हजार व्यक्तींमागे एका व्यक्तीत आढळते. अशा रुग्णांमध्ये हृदयाच्या झडपेचा विकार आढळणे तुलनेने दुर्मिळ आहे. या महिला रुग्णाच्या हृदयाच्या मायट्रल झडपेला आधार देणाऱ्या यंत्रणेत बिघाड झाल्याने झडपेतून रक्ताची गळती होत होती. ‘मायट्रल व्हॉल्व्ह रिगर्जिटेशन’ या विकारामुळे तिला वारंवार हृदय निकामी होण्याचा त्रास होत होता. त्यातच मणक्याचा तीव्र ‘एस’ आकाराचा बाक, फुफ्फुसांची कमी कार्यक्षमता, कमी उंची आणि आखूड मान यांमुळे शस्त्रक्रिया व भूल देणे अधिक आव्हानात्मक झाले होते. सीव्हीटीएस तज्ज्ञ डॉ. प्रणव माळी यांनी सांगितले की, अशा रुग्णांवर शस्त्रक्रिया करताना हृदयाची असामान्य रचना आणि इतर शारीरिक अडचणी लक्षात घेऊन विशेष नियोजन करावे लागते. अचूक निदान, बारकाईने केलेले नियोजन आणि विविध तज्ज्ञांमधील समन्वयामुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. यासाठी भूलतज्ज्ञांच्या टीमचे मोलाचे सहकार्य लाभले. या प्रक्रियेत हॉस्पिटलमधील हृदयरोगतज्ज्ञही उपलब्ध होते.

चौकट

दुर्मिळ आणि गुंतागुंतीच्या आजारांवरील उपचारांसाठी आधुनिक वैद्यकीय सुविधा, अनुभवी तज्ज्ञ आणि समन्वयपूर्ण उपचारपद्धती महत्त्वाची असते. रुग्णांना योग्य निदान व आवश्यक उपचार उपलब्ध करून देण्यासाठी हॉस्पिटल प्रयत्नशील असून, आव्हानात्मक प्रकरणांमध्ये रुग्णकेंद्रित उपचारांना प्राधान्य दिले जाते.

अनुप त्रिपाठी, सेंटर हेड, अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande