
छत्रपती संभाजीनगर, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथील जाबिंदा मैदानावर देवेंद्र सेवा महोत्सवांतर्गत आयोजित होणाऱ्या 'प्रौढ प्रताप पुरंदर' या महानाट्याच्या तयारीचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून आज स्तंभपूजन करण्यात आले. कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आणि स्वराज्याचा गौरवशाली इतिहास रंगमंचावर साकारणाऱ्या या भव्य कलाविष्काराच्या तयारीला प्रारंभ झाला.
शिवरायांचा पराक्रम आणि स्वराज्याचा इतिहास हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा पाया आहे. असा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारे उपक्रम समाजात प्रेरणा आणि कर्तव्यभावना जागवतात. मुख्यमंत्री देवेंद्र सेवा महोत्सवाचे अध्यक्ष श्री. राजेंद्रजी साबळे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या या महानाट्यासाठी शुभेच्छा.
याप्रसंगी प्रदेश सचिव प्रवीणजी घुगे, शहर जिल्हाध्यक्ष किशोरजी शितोळे, जिल्हा मध्यवर्ती बँक उपाध्यक्ष श्री रामराव शेळके पदाधिकारी, कार्यकर्ते व देवेंद्र सेवा महोत्सवाचे सर्व प्रमुख सदस्य उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis