
छत्रपती संभाजीनगर, 11 ऑक्टोबर (हिं.स.)।
बळीराजावर आलेले संकट दूर होऊ दे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली प्रार्थना
संत एकनाथ महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पैठणनगरीत असलेल्या जायकवाडी प्रकल्प (नाथसागर) येथील जलसाठा संपत चालला आहे. यासाठी मराठवाडा आणि छत्रपती संभाजीनगरची तहान भागणाऱ्या नाथसागराचा जलसाठा टिकून राहण्यासाठी शिवसेनेतर्फे रविवारी विधिवत जलपूजन करण्यात आले.
यावेळी गोदामातेची साडीचोळी आणि श्रीफळ अर्पण करण्यात आली. तसेच दुष्काळी परिस्थितीत पाणी कायम टिकून राहावे, बळीराजावर आलेले संकट दूर होऊ दे, यासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी नाथ महाराज्यांच्या चरणी प्रार्थना केली.
याप्रसंगी माजी महापौर सुदाम सोनवणे, शिक्षक सेनेचे पद्माकर इंगळे, जिल्हा परिषदेचे गटनेते मनोज पेरे पाटील, उपजिल्हाप्रमुख हिरालाल सलामपुरे, विधानसभा संघटक सुनील शिंदे, ऋषिकेश पाटील आदी उपस्थिती होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis