मतदार नोंदणी व दुरुस्तीसाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
अकोला, १२ ऑक्टोबर (हिं.स.) : महाराष्ट्रात विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतून नाव वगळणे तसेच यादीतील चुका दुरुस्त करण्यासाठी २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पात्र नागरिकांनी या संधी
मतदार नोंदणी व दुरुस्तीसाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ


अकोला, १२ ऑक्टोबर (हिं.स.) : महाराष्ट्रात विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतून नाव वगळणे तसेच यादीतील चुका दुरुस्त करण्यासाठी २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पात्र नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन वेळेत नोंदणी व आवश्यक दुरुस्त्या करून घ्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.

१ ऑक्टोबर २०२६ हा अर्हता दिनांक निश्चित करून सुरू असलेल्या मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक केंद्रीय निवडणूक आयोगाने १२ ऑक्टोबर रोजी अधिसूचित केले. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांनी केलेल्या विनंतीचा विचार करून ही मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी दावे व हरकती सादर करण्याची अंतिम मुदत १२ ऑक्टोबर होती. ती आता वाढवून २६ ऑक्टोबर करण्यात आली आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार, दावे व हरकती सादर करण्याची अंतिम मुदत २६ ऑक्टोबर २०२६ असून, प्राप्त दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

या मुदतवाढीमुळे नव्याने पात्र ठरलेल्या नागरिकांना मतदार म्हणून नाव नोंदविण्यास, तसेच विद्यमान मतदारांना त्यांच्या नावातील किंवा इतर तपशिलांतील चुका दुरुस्त करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र नागरिकांनी विहित मुदतीत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande