
अकोला, 12 ऑक्टोबर (हिं.स.)। अकोला जिल्हा कोषागारातर्फे राज्य शासन निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक, तसेच सर्व आहरण व संवितरण अधिका-यांसाठी कार्यशाळा व पेंशन अदालत मंगळवारी, दि. १३ ऑक्टोबरला सकाळी ११ वा. जिल्हाधिकारी कार्यालयातील काटेपूर्णा सभागृहात होईल.
सेवा संकल्प अभियानानिमित्त कार्यशाळेचे उद्घाटन सकाळी ११ वा. होणार आहे. त्यानंतर ‘डीडीओं’ची कार्यशाळा होऊन त्यात ई-पीपीओ, ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली, थेट प्रकरण स्थिती ट्रॅकिंग, निवृत्तीवेतनधारक समाधान यासारख्या उपक्रमांचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर दु. २.३० वा. निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीधारकांसाठी पेन्शन अदालत होऊन संबंधित अडचणींचे निराकरण करण्यात येईल.
सर्व निवृत्तीधारक व कुटुंब निवृत्तीधारकांनी, तसेच सर्व आहरण व संवितरण अधिका-यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कोषागार अधिकारी मा. ब. झुंजारे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे