हुथी बंडखोरांचा रियाध विमानतळावर पुन्हा हल्ला; एकाचा मृत्यू, ११ जण जखमी
रियाध, 12 ऑक्टोबर (हिं.स.)।येमेनमधील इराणसमर्थित हुथी बंडखोरांकडून सौदी अरेबियातील आंतरराष्ट्रीय विमानतळांवर सातत्याने हल्ले केले जात आहेत. रविवारी रियाध येथील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल ४ वर झालेल्या नव्या क्षेपणास्त्र हल्ल्यात
हुथी बंडखोरांचा रियाध विमानतळावर पुन्हा हल्ला; एकाचा मृत्यू, ११ जण जखमी


रियाध, 12 ऑक्टोबर (हिं.स.)।येमेनमधील इराणसमर्थित हुथी बंडखोरांकडून सौदी अरेबियातील आंतरराष्ट्रीय विमानतळांवर सातत्याने हल्ले केले जात आहेत. रविवारी रियाध येथील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल ४ वर झालेल्या नव्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर अन्य ११ जण जखमी झाले.

सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, हुथी बंडखोरांनी रियाधमधील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल ४ ला लक्ष्य करून अज्ञात प्रकारचे क्षेपणास्त्र डागले. त्यामुळे विमानतळ परिसरात भीषण आग लागली.दरम्यान, सौदी अरेबियाच्या हवाई संरक्षण यंत्रणेने तत्परता दाखवत विमानतळाच्या दिशेने येणारे क्रूझ क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केले. याशिवाय, पूर्व प्रांतात एका हल्लेखोर ड्रोनला पाडण्यात आले. तसेच, खमिस मुशैत शहराच्या दिशेने डागण्यात आलेले बॅलिस्टिक क्षेपणास्त्रही यशस्वीरीत्या निकामी करण्यात आले.

दरम्यान, सौदी नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने रविवारी रात्री उशिरा दम्माम विमानतळावर झालेल्या हल्ल्याला दुजोरा दिला. या घटनेतील नुकसानीचे मूल्यांकन आणि सुरक्षा तपासणी सुरू असल्याचे प्राधिकरणाने सांगितले.दम्माम विमानतळाच्या धावपट्टीवर उभ्या असलेल्या विमानात प्रवास करणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने वृत्तसंस्थाला सांगितले की, स्थानिक वेळेनुसार रात्री सुमारे ८.३० वाजता उभ्या असलेल्या विमानांजवळ एक क्षेपणास्त्र कोसळले. त्यानंतर लगेचच आगीच्या ज्वाळा उसळल्या.या घटनेनंतर टॅक्सींग करत असलेल्या विमानाला पुन्हा विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ आणण्यात आले आणि प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

हुथी बंडखोरांनी केलेला हा हल्ला, एका दिवसापूर्वी झालेल्या त्या हल्ल्यानंतर घडला आहे, ज्यात १३ जणांचा मृत्यू झाला होता आणि ३०० हून अधिक जण जखमी झाले होते.या आठवड्यात सौदी अरेबियातील विमानतळांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १८ वर पोहोचली आहे. शनिवारी रियाध विमानतळावर झालेल्या हल्ल्यात चार सौदी नागरिकांसह १३ जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये उर्वरित परदेशी नागरिकांचा समावेश होता. मृतांमध्ये ४६ वर्षीय भारतीय नागरिक मोहम्मद युसूफ यांचाही समावेश होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande