शहाबाजमध्ये ४.८४ लाखांचे दागिने चोरीला
रायगड, १२ ऑक्टोबर (हिं.स.) : रायगड जिल्ह्यातील शहाबाज येथे घरात स्टीलच्या डब्यात ठेवलेले ४ लाख ८४ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना ११ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण
Jewelry worth ₹4.84 lakh stolen in Shahbaz


रायगड, १२ ऑक्टोबर (हिं.स.) : रायगड जिल्ह्यातील शहाबाज येथे घरात स्टीलच्या डब्यात ठेवलेले ४ लाख ८४ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना ११ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला सर्वपित्री अमावस्या आणि नवरात्रोत्सवानिमित्त पनवेल येथून शहाबाज येथील आपल्या गावी आल्या होत्या. त्यांनी सोन्याचे दागिने एका स्टीलच्या डब्यात ठेवून तो डबा बॅगेतून आणला होता. मात्र, दागिने काढल्यानंतर डबा पुन्हा बॅगेत न ठेवता बाहेरच राहिला. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने डब्यातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) नुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक विनोद सुर्वे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande