वाढदिवसाऐवजी मुख्यमंत्री मदत निधीत योगदान द्यावे-नंदकिशोर मुंदडा
बीड, १४ ऑक्टोबर (हिं.स.) : राज्यात आणि परिसरात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अंबाजोगाई नगरपरिषदेचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी दसऱ्याच्या दिवशी येणारा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढदिवसानि
नंदकिशोर मुंदडा


बीड, १४ ऑक्टोबर (हिं.स.) : राज्यात आणि परिसरात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अंबाजोगाई नगरपरिषदेचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी दसऱ्याच्या दिवशी येणारा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ, शाल, हारतुरे आणि बॅनरबाजीवर खर्च करण्याऐवजी ती रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दान करावी, असे आवाहन त्यांनी आपल्या हितचिंतकांना आणि कार्यकर्त्यांना केले आहे. त्यांच्या या निर्णयातून सामाजिक बांधिलकी आणि दुष्काळग्रस्तांप्रती संवेदनशीलतेचे दर्शन घडत आहे.

सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत. अशा संकटाच्या काळात उत्सवावर अनावश्यक खर्च करण्याऐवजी गरजू नागरिकांना मदत करणे महत्त्वाचे असल्याची भूमिका नंदकिशोर मुंदडा यांनी घेतली आहे.

दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर त्यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिक, हितचिंतक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी एकत्र येतात. मात्र, यंदाची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी वाढदिवसाचा कोणताही मोठा सोहळा आयोजित न करण्याचे ठरवले आहे. तसेच शुभेच्छांसाठी जाहिराती, बॅनर, हारतुरे आणि इतर सजावटींवर अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी इच्छादान पेटी

वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना मदतीचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा उपक्रमही मुंदडा यांनी सुचविला आहे. पुष्पगुच्छ किंवा शाल आणण्याऐवजी त्या रकमेचे दान मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ठेवलेल्या इच्छादान पेटीत जमा करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

या माध्यमातून जमा होणाऱ्या निधीचा उपयोग दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी व्हावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. नागरिकांनी शुभेच्छांसोबत सामाजिक मदतीचा हात पुढे करावा आणि गरजूंच्या अडचणी कमी करण्यासाठी योगदान द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande