
परभणी, 14 ऑक्टोबर (हिं.स.)।
आडगाव (दराडे) येथील श्री तुळजाभवानी शुगर प्रा. लि. कारखान्याच्या मोळीपूजनासह गळीत हंगामाचा शुभारंभ चेअरमन भावना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी मीनाताई बोर्डीकर, सचिन मुंगसे पाटील आणि सचिन गोरे यांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस प्रेसिडेंट विवेक भारद्वाज, जनरल मॅनेजर विजय मते, वर्क्स मॅनेजर टोकलवाड, चीफ केमिस्ट कटियार, मुख्य शेतकी अधिकारी पाटील, ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी व वाहतूक कंत्राटदार तसेच कारखान्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. सहकार क्षेत्र हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून, साखर कारखाना शेतकरी, कामगार आणि परिसराच्या आर्थिक प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावतो. यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करून ऊस उत्पादक शेतकर्यांना लाभ मिळवून देणे, कामगारांच्या कष्टांचा सन्मान राखणे आणि कारखान्याची प्रगती साधणे हे उद्दिष्ट असल्याचे यावेळी सांगण्यात आले.आधुनिकीकरणानंतर सुरू झालेला हा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी शेतकर्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्याकडे पाठवावा, असे आवाहन चेअरमन भावना बोर्डीकर यांनी केले. चालू हंगामात सहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सक्षम तोडणी व वाहतूक यंत्रणा आणि अद्ययावत मशिनरीच्या बळावर हे उद्दिष्ट पूर्ण होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. गळीत हंगाम यशस्वी होण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी व वाहतूक कंत्राटदार तसेच कारखान्याचे अधिकारी व कर्मचार्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis