सणासुदीपूर्वी गोदरेज प्रोफेशनलकडून मॅजेस्टे हेअर कलर सिरीज लाँच
मुंबई, १४ ऑक्टोबर, (हिं.स) : गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (जीसीपीएल) कंपनीच्या ‘गोदरेज प्रोफेशनल’ या प्रसिद्ध हेअर ब्रँण्डने नवीन हेअर कलर रेंज ‘मॅजेस्टे’ लाँच केली आहे. गोदरेज प्रोफेशनल हा ब्रँण्ड हेअर केअर, कलर, स्टायलिंग आणि ट्रीटमेंट्स य
सणासुदीपूर्वी गोदरेज प्रोफेशनलकडून मॅजेस्टे हेअर कलर सिरीज लाँच, ७०० हून अधिक व्यावसायिंकाचे यशस्वी प्रशिक्षण


मुंबई, १४ ऑक्टोबर, (हिं.स) : गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (जीसीपीएल) कंपनीच्या ‘गोदरेज प्रोफेशनल’ या प्रसिद्ध हेअर ब्रँण्डने नवीन हेअर कलर रेंज ‘मॅजेस्टे’ लाँच केली आहे. गोदरेज प्रोफेशनल हा ब्रँण्ड हेअर केअर, कलर, स्टायलिंग आणि ट्रीटमेंट्स यांसाठी ओळखला जातो. ‘मॅजेस्टे’ ही सिरीज ‘डायमेन्शन’ या अमोनिया-मुक्त तंत्रज्ञानावर आधारित आहे. सणासुदीच्या काळात सलूनमध्ये ग्राहकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन हे नवीन प्रॉडक्ट्स बाजारात उपलब्ध करण्यात आले आहेत.

‘मॅजेस्टे’ या नव्या हेअर कलरची सिरीज राजेशाही थाट आणि मौल्यवान रत्नांच्या नयनरम्य प्रकाशापासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आली आहे. शाही रंगानी खुलून दिसणारे रंग प्रभावी दिसावेत तसेच केसांना मनमोहक पद्धतीने खुलवता यावेत, यासाठी या रंगांची संकल्पना मांडण्यात आली आहे. हेअर स्टायलिस्टना आपल्या कौशल्याने केसांचे सौंदर्य खुलवण्यासाठी यामध्ये खास तीन आकर्षक शेड्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ‘फ्लोरेन्स गोल्ड’ हा ब्राऊन-गोल्ड शेट केसांना समृद्ध बनवतो. या रंगाच्या वापराने केस चमकदार होतात शिवाय मॉडर्न लुक दिसतो. ‘रोमन एंबर’ ही कॉपर-ब्राऊन शेड प्राचीन साम्राज्यांचे वैभव आणि आधुनिक लक्झरीचा मेळ साधते. ‘पॅरिसियन रूज’ ही लालसर-तपकिरी शेड गडद लाल व वाईन्सच्या रंगांच्या छटांसोबत हाय-फॅशन ग्लॅमरचा मनमोहक अनुभव घडवून आणते.

गोदरेज प्रोफेशनलने ‘मॅजेस्टे’ हेअर कलस सिरीजच्या लाँचनिमित्ताने महाराष्ट्रासह, गुजरात, पंजाब आणि आसाम या चार राज्यांत खास प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांना हेअर स्टायलिस्ट आणि सलून मालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. गोदरेज प्रोफेशनचे तांत्रिक प्रमुख शैलेश मूळ्ये यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. यामध्ये केस रंगवण्याच्या आधुनिक पद्धतींचे प्रात्यक्षित दाखवण्यात आले. या उपक्रमामुळे चारही शहरांतील ७०० पेक्षा जास्त सलून व्यावसायिकांना नव्या आंतरराष्ट्रीय हेअर ट्रेंड्सची माहिती मिळाली.

‘मॅजेस्टे’ या नव्य सिरीजच्या अनावरणाप्रसंगी गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्टस लिमिटेडटे मार्केटिंग एव्हीपी (हेअर कॅटेगरी) भूमिका गोयल म्हणाल्या,” केस रंगवणे आता केवळ सणासुदीपुरते मर्यादित राहिले नसून, हेअर कलर आता रोजच्या लाइफस्टाइलचा भाग झाला आहे. सणांच्या दिवसांत सलूनमध्ये ही मागणी वाढते. सलून व्यावसायिकांना या संधीचा पूरेपूर फायदा घेता यावा, यासाठीच मॅजेस्टेची निर्मिती करण्यात आली आहे. आम्ही ७०० पेक्षा जास्त हेअर स्टायलिस्टना याचे प्रशिक्षण दिले आहे. यामुळे सलूनमधील काम सोपे आणि सुलभरित्या हाताळता येईल. आमच्या ‘डायमेन्शन’ या अमोनिया-मुक्त कलर रेंजचा वापर वाढण्यासही मदत होईल.”

गोदरेज प्रोफेशनलचे राष्ट्रीय तांत्रिक प्रमुख शैलेश मूळ्ये म्हणाले,” ‘मॅजेस्टे’ ही केस रंगवण्याची आकर्षक आणि क्लासिक पद्धत आहे. यात ‘फ्लोरेन्स गोल्ड’, ‘रोमन नंबर’ आणि ‘पॅरिसियन रूज’ या तीन शेड्स उपलब्ध आहेत. हे शेड्स मौल्यवान रत्नांच्या चमकत्या प्रकाशापासून तयार करण्यात आले आहेत. यातील प्रत्येक शेड्सची स्वतःची खास आगळीवेगळी ओळख आणि सौंदर्य आहे. हे रंग हेअर स्टायलिस्टना आपली कलात्मकता दाखवण्यासाठी नवीन संधी देतात. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाच्या आवडीनुसार त्यांना नवा लुक देता येईल. सद्यस्थितीत समाजात वावरताना वेगवेगळ्या हेअर स्टाइलला पसंती दिली जात आहे. भारतातील सलून व्यावसायिकांनी या बदलामध्ये आघाडीवर राहावे, हाच आमचा प्रयत्न आहे.”

या नवीन सिरीजच्या माध्यमातून गोदरेज प्रोफेशनलने सलून क्षेत्राचे नव्याने बळकटीकरण केले आहे. नव्या रंगसंगतीच्या माध्यमातून या क्षेत्राचे उद्दातीकरण करण्याची कंपनीची कटिबद्धताही यातून दिसून येते. याकरिता नवनवीन रंगांचे लाँचिंग, आंतरराष्ट्रीय ट्रेंड्स आणि योग्य तांत्रिक प्रशिक्षण याद्वारे ब्रँण्ड नेहमीच प्रयत्नशील असतो. यामुळे सलून व्यावसायिकांना ग्राहकांच्या पसंतीनुसार उत्तम आणि वैयक्तिक हेअर स्टाइल देण्याचे कसब मिळते. ‘मॅजेस्टे’ ही नवीन हेअर कलर सिरीज आता देशभरातील आघाडीच्या सलूनमध्ये उपलब्ध असेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande