
अकोला, 16 ऑक्टोबर (हिं.स.)। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अकोला महानगराच्या वतीने चंद्रगुप्त मौर्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकोला येथे विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत तसेच स्वच्छतागृहबाबत अ.भा.वि.प चे शांतता प्रिय आंदोलन करण्यात आले. गेल्या दोन वर्षापासून विद्यार्थ्यांच्या स्वच्छता गृहाचा प्रश्न प्रलंबित होता अ.भा.वि.प अकोला महानगराच्या वतीने खंडरवस्थेत असलेले स्वच्छतागृह सुधारून विद्यार्थ्यांना खुले करावे. फिल्टर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रशिक्षण संस्थेने करावी. म्हणून अ.भा.वि.प अकोला महानगर वतीने एक महिन्या पूर्वी निवेदन देण्यात आले होते. सदरचा एक महिना उलटूनही पाठपुरावा करूनही औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रशासनाने कोणत्याही प्रकारची केली नाही. त्यामुळे अ.भा.वि.प. आंदोलनाचा इशारा दिला. प्रशिक्षण संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर विद्यार्थी परिषदेने ठिय्या आंदोलन केले जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या समस्याचे निराकरण होत नाहीत तोवर अ.भा.वि.प पाठपुरावा करत राहील. येत्या दिवसात विद्यार्थी समस्येचे निराकरण न झाल्यास. तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.
दरम्यानच्या काळात व्यवस्था विस्कळीत झाली होती. परंतु हे आंदोलन विद्यार्थी समस्या व छात्र हिताचे होते अशी भूमिका अभाविप ने स्पष्ट केली. यावेळी विदर्भ प्रांत सहमंत्री चंद्रकांत बोबडे ,गणेश कापसे प्रदेश कार्यकारणी सदस्य,अकोला जिल्हा संयोजक प्रणव पाटील,अकोला महानगर मंत्री प्रथमेश ढाकरे सहमंत्री तेजस्विनी रणपिसे. जिल्हा संयोजक प्रणव पाटील SFS नगर संयोजक प्रणव दार्वेकर अकोला पश्चिम नगर मंत्री ऋषिकेश पिंजरकर सहमंत्री तेजस घाटोळे वैभवी ठोकाडे श्रद्धा लखपती. सोनाली गोस्वामी. अकोला पूर्व महानगर मंत्री परीक्षित कोल्हे पराग वाघमारे भाग संयोजक सिद्धेश जोशी दीप साबळे देव गुप्ता आदित्य आढाउ आदित्य तिवारे व अ.भा.वि.प चे विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे