
नाशिक, 16 ऑक्टोबर (हिं.स.)। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी स्थापन केलेल्या अभिनव भारत मंदिराचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुरु आहे. या मंदिरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवन कार्यावर आधारित माहिती देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्री. महाजन यांनी आज दुपारी अभिनव मंदिरास भेट देवून पाहणी केली.
यावेळी महापौर हिमगौरी आडके, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, नगरसेविका आदिती पांडे आदी उपस्थित होते.
यावेळी वास्तुविशारद निनाद बोथरा यांनी सादरीकरणाद्वारे अभिनव भारत मंदिरात करण्यात येत असलेल्या कामांची माहिती पालकमंत्री श्री. महाजन यांना दिली. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटना आणि त्यांच्या कार्याची माहिती देणारा माहितीपट पालकमंत्री श्री. महाजन यांच्यासह उपस्थितांनी बघितला.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI