वाढवणा पोलीसांची कामगिरी; चोरीच्या ट्रॉलीसह आरोपींना अटक
लातूर, १६ ऑक्टोबर (हिं.स.) : वाढवणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मन्ना उमरगा येथील शेतशिवारातून चोरीस गेलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा गुन्हा उघडकीस आणण्यात वाढवणा पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून अंदाजे ७०
पोलीस कारवाई


लातूर, १६ ऑक्टोबर (हिं.स.) : वाढवणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मन्ना उमरगा येथील शेतशिवारातून चोरीस गेलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा गुन्हा उघडकीस आणण्यात वाढवणा पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून अंदाजे ७० हजार रुपये किमतीची चोरीची ट्रॉली जप्त करण्यात आली आहे.

मन्ना उमरगा येथील सर्व्हे क्रमांक ४३ मधील शेतशिवारात लावलेली ट्रॅक्टरची ट्रॉली चोरीस गेली होती. याप्रकरणी वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांची चौकशी करण्यात आली. यामध्ये धनंजय संतोष लासुरे (वय २३), ओम साई निलेश बिरादार (वय २२) आणि रामेश्वर उमाकांत कबाडे, तिघेही रा. तोंडार, ता. उदगीर, यांची चौकशी करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीस गेलेली अंदाजे ७० हजार रुपये किमतीची ट्रॅक्टरची ट्रॉली जप्त करण्यात आली.

ही कारवाई वाढवणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय दळवे, पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवप्रताप रंगवाळ, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी गाडगे आणि पोलीस वाहनचालक मधुकर कारलेवाड यांच्या पथकाने केली.

या कारवाईमुळे शेतशिवारातून चोरीस गेलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा गुन्हा उघडकीस आणण्यात वाढवणा पोलिसांना यश आले आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande