अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार
नाशिक, 16 ऑक्टोबर (हिं.स.)। अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन, तसेच पहिल्या लग्नाची कल्पना न देता महिलेशी दुसरा विवाह करून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २६ वर्षीय फिर्यादी महिलेन
अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार


नाशिक, 16 ऑक्टोबर (हिं.स.)। अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन, तसेच पहिल्या लग्नाची कल्पना न देता महिलेशी दुसरा विवाह करून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत २६ वर्षीय फिर्यादी महिलेने फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले, की आरोपी मनीष लक्ष्मण पारखे (रा. भुसावळ, जि. जळगाव) याने २६ वर्षीय पीडितेचा विश्वास संपादन करून तिच्यासोबत जबरीने अत्याचार करून त्या लैंगिक अत्याचाराचे फोटो काढले व ते फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली, तसेच पारखे याने पहिले लग्न झालेले असतानाही पीडितेला त्याची कोणतीही कल्पना न देता

तिच्यासोबत दुसरा विवाह केला. त्यानंतर पीडितेला वारंवार मोबाईल फोन करून त्रास दिला. हा प्रकार दि. २२ सप्टेंबर रोजी काळाराम मंदिराशेजारी असलेल्या राघव हॉटेलमध्ये घडला. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मनीष पारखेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande