लातूरच्या मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडण्यांवर धडक कारवाई!
लातूर, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। उपायुक्त पंजाबराव खानसोळे यांच्या पुढाकारातून अनधिकृत जोडण्या तोडण्याची मोहीम सुरू! लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडण्या तोडण्याची धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. महानगरपालिकेचे उपायुक्
पंजाब खानसोळे


लातूर, 18 ऑक्टोबर (हिं.स.)।

उपायुक्त पंजाबराव खानसोळे यांच्या पुढाकारातून अनधिकृत जोडण्या तोडण्याची मोहीम सुरू!

लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडण्या तोडण्याची धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. महानगरपालिकेचे उपायुक्त पंजाबराव खानसोळे यांच्या कारवाईतून अनधिकृत नळजोडण्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहावा, पाण्याची गळती व अपव्यय रोखला जावा, या दृष्टीने ही मोहीम महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या कारवाईमुळे अनधिकृत नळजोडणीधारकांचे धाबे दणाणले असून, पुढील काळातही ही मोहीम सुरू राहणार का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande