
लातूर, 18 ऑक्टोबर (हिं.स.)।
'सौर संवाद २०२६' यात्रेला लातूरमध्ये प्रतिसाद; युवक, महिलांसाठी उद्योजकतेच्या संधींची माहिती
सौर ऊर्जेचा वापर वाढविण्यासोबतच या क्षेत्रातील व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यासाठी गोपाल काबरा फाउंडेशन आणि जीके एनर्जी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'सौर संवाद २०२६' यात्रेला लातूरमध्ये प्रतिसाद मिळाला. एमआयडीसी परिसरातील वरवंटी येथील हॉटेल एनराईज्ड बाय सयाजी येथे मेळावा झाला.
जीके एनर्जीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गोपाल काबरा म्हणाले, सौर ऊर्जा ही केवळ वीज निर्मितीपुरती मर्यादित नसून, तिच्यातून स्थानिक व्यवसाय आणि रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होऊ शकतात. युवक आणि महिलांना या क्षेत्रातील असून, केंद्र व राज्य सरकारच्या प्रोत्साहनपर योजनांची माहितीही या माध्यमातून दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. सौर ऊर्जेच्या वापरात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर असल्याचेही काबरा यांनी नमूद केले. १ ही यात्रा १४ जिल्ह्यांतून जाणार असून, राज्यातील ३४ जिल्ह्यांतील इच्छुक उद्योजकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. घरांच्या छतावरील सौर यंत्रणा, व्यावसायिक सौर प्रकल्प, कृषिपंप, ऊर्जा साठवण, यंत्रणा बसविणे व देखभाल यांसह विक्री आणि तांत्रिक सेवांमधील व्यवसायाच्या संधींची माहिती दिली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis