बीडमध्ये विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाचा शिक्षकाविरुद्ध गुन्हा
बीड, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। चौथीतील विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर प्रकार उघड; पोक्सोअंतर्गत कारवाई : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चौथीच्या विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून शिक्षक अविनाश ढेरे याच्यावि
लैंगिक शोषण प्रकरणी गुन्हा दाखल


बीड, 18 ऑक्टोबर (हिं.स.)।

चौथीतील विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर प्रकार उघड; पोक्सोअंतर्गत कारवाई

: बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चौथीच्या विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून शिक्षक अविनाश ढेरे याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १२ ते १४ ऑक्टोबर दरम्यान शाळेतील मधल्या सुट्टीत आणि शाळा सुटल्यानंतर आरोपी शिक्षकाने काही विद्यार्थिनींना वर्गात थांबवून त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. गुरुवारी सायंकाळी एका विद्यार्थिनीने घरी जाऊन आईला याबाबत माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर अन्य विद्यार्थिनींसोबतही अशाच प्रकारचे गैरवर्तन झाल्याची माहिती समोर आली.

घटनेची माहिती मिळताच पालक आणि ग्रामस्थांनी शाळेत धाव घेतली. त्यांनी संबंधित शिक्षकाला जाब विचारल्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्यात आली.

पिंक पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक भागवत कदम या प्रकरणाचा तपास करीत आहेत. या घटनेमुळे परिसरातील पालकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा चर्चेत आला आहे. प्रकरणातील आरोपांबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande