खामगाव-पंढरपूर महामार्गावर बस आणि कारचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
बीड, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। : तुळजापुरला दर्शनासाठी निघालेल्या बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील भाविकांच्या कारचा आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्या ची दुर्दैवी घटना घडली. घटनेची माहिती माजलगाव तालुक्यात पसरता
अपघात


बीड, 18 ऑक्टोबर (हिं.स.)।

: तुळजापुरला दर्शनासाठी निघालेल्या बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील भाविकांच्या कारचा आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्या ची दुर्दैवी घटना घडली. घटनेची माहिती माजलगाव तालुक्यात पसरताच पूर्ण माजलगाव तालुक्यावर शोककळा निर्माण झाली आहे.

सविस्तर वृत्त असे की आज सकाळी १०:२०मिनटाच्या सुमारास माजलगावातून तुळजापुराला दर्शनासाठी जात असताना खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर शिंदेवाडी जवळ माजलगावकडे येणारी बस आणि तेलगाव कडे जाणारी कारचा १०:४९मिनटाच्या सुमारास समोरासमोर अपघातात झाला अपघातात पाच जण जागीच ठार झाले

अपघात एवढा भीषण होता की कारचे एअर बॅग सुद्धा फुटले होते

अपघातात मरण पावलेले मयतांची नाव १) गजानन महादेव नामदसे वय (३७)

२) समर्थ गजानन नामदसे दोन्ही राहणार पाचपीर भाटवडगाव माजलगाव ३) सोमनाथ बडे वय (२३) रा. फुलेनगर माजलगाव ४) ओम महादेव गिरी वय 24 राहणार माजलगाव ५) अनिल शेन (आचारी)रा. राजस्थान

या भीषण अपघातात सर्व पाचजन जागीच मरण पावले विशेष म्हणजे या पाच जणात बाप लेकाचा हे समावेश आहे.

घटनास्थळावरून मयताला शवविच्छेदनासाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande